Headlines

पक्षाला प्रथम प्राधान्य दिल्यास पदे मिळत जातील

काँग्रेसच्या बैठकीत संपर्कमंत्री सतेज पाटील यांचे प्रतिपादन

ओरोस-:काँग्रेस संपलेली नाही. संपणारही नाही. काँग्रेस पक्षाला पहिले प्राधान्य देऊन काम करणाऱ्या कार्यकर्त्याला दोन किंवा तीन नंबरचे पद मिळते. पक्ष हा पायरी आहे. या पायरीचा पाया डळमळीत असल्यास पक्षाची इमारत उभी राहणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने जोमाने कामाला लागले पाहिजे. २०२४ मध्ये किमान एक आमदार जिल्ह्यात निवडणून येईल, असे एकच लक्ष ठेवून सर्वांनी कामाला लागावे असे आवाहन राज्याचे गृहराज्यमंत्री तथा जिल्ह्याचे काँग्रेसचे संपर्कमंत्री सतेज पाटील यांनी मंगळवारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना केले. सिंधुदुर्गनगरी येथील शासकीय विश्रामगृह येथे जिल्ह्यातील राज्य, जिल्हा व तालुका पदाधिकारी यांच्याशी संवाद साधला. यावेळी जिल्हाध्यक्ष चंद्रकांत गावडे, जिल्हा प्रभारी घोरपडे, विकास सावंत, साईनाथ चव्हाण, इरशाद शेख, नीता राणे, विद्याप्रसाद बांदेकर, अरविंद मोंडकर, बाळू अंधारी, दादा परब यांच्यासह असंख्य पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना मंत्री पाटील यांनी पक्षात व्यक्ती म्हणून विचार न करता पक्ष म्हणून विचार करा. भविष्यात नगर परिषदा निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्या स्वबळावर किंवा आघाडी करून लढायच्या याचा निर्णय स्थानिक पातळीवर घ्या. पक्षातील कोणाचेही काम असेल तर कोल्हापूर किंवा मुबई येथील निवास्थानी या. तुमचे जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न करेन. तुमच्या सोबत अन्य मंत्र्यांच्या कॅबिनमध्ये मी येईन. परंतु याची नोंद माझ्याजवळ असणार आहे. ज्याचे काम करणार त्याचे पक्षासाठी किती योगदान आहे, हे मी पाहणार. योगदान दिसले नाहीतर पुढचे काम उशिराने होणार, असेही मंत्री पाटील यांनी सांगित मी दहा पावले तुमच्यासाठी चाललो तर तुम्ही पक्षासाठी १०० पावले चाला, असे आवाहन केले.

You cannot copy content of this page