काँग्रेसमध्ये भाजप, सेना, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा प्रवेश

गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केले स्वागत

ओरोस-:देवगड तालुक्यातील भाजपाचे माजी पंचायत समिती सदस्य अरविंद भोगले यांच्यासह देवगड व वैभववाडी तालुक्यातील भाजप, सेना व राष्ट्रवादी पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी मंगळवारी गृहराज्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे काँग्रेस पक्षाचे संपर्कमंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मंत्री पाटील यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. मंत्री पाटील एक दिवसाचा जिल्हा दौऱ्यावर मंगळवारी आले होते. त्यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्गनगरी येथील शासकीय विश्रामगृह येथे काँग्रेस पदाधिकारी यांची बैठक झाली. या बैठकी नंतर हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम झाला. यावेळी प्रभारी श्री घोरपडे, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत गावडे, प्रदेश सदस्य साईनाथ चव्हाण, जिल्हा बँक संचालक विकास सावंत, नीता राणे, विद्याप्रसाद बांदेकर, दादा परब, इरशाद शेख यांच्यासह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. देवगड व वैभववाडी तालुक्यातील भाजप, राष्ट्रवादी व शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते काँग्रेसमध्ये प्रवेश करीत असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले. भाजप माजी पंचायत समिती सदस्य अरविंद भोगले यांच्यासह विजय कदम, भाई सावंत, रामा गावडे, गौरेश वालावलकर, संतोष वालावलकर व असंख्य महिला-पुरुष कार्यकर्त्यांनी यावेळी काँग्रेसचा हात धरला.

You cannot copy content of this page