युवासेना उपजिल्हाधिकारी सागर नाणोसकर यांची माहिती
सावंतवाडी-:आजगाव येथे उभारण्यात आलेल्या बीएसएनएल टॉवरचे खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते १ ऑक्टोबर रोजी उद्घाटन होणार आहे. याबाबतची माहिती युवासेना उप जिल्हाधिकारी सागर नाणोसकर यांनी दिली आहे. हा टॉवर कार्यान्वित व्हावा यासाठी खासदार विनायक राऊत यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. त्यांच्याच प्रयत्नांमुळे १ ऑक्टोंबर पासून हा टॉवर कार्यान्वित होत आहे.
