मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला सन्मान;पर्यटन विकास महामंडळाने केले हिते आयोजन
ओरोस ता २८ महाराष्ट्र राज्यातील खादयसंस्कृतीला आणि पाककलेला चालना देणे तसेच या माध्यमातून देश विदेशातील पर्यटकांना महाराष्ट्राकडे आकर्षित करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य पर्यटन संचालनालयाच्या वतीने ‘महाराष्ट्राचे मास्टरशेफ’ या रेसिपी स्पर्धेचे ऑनलाईन पदधतीने आयोजन करण्यात आले होते. आपल्या आवडत्या महाराष्ट्रीयन डिशचा व्हिडीओ रेसिपी ऑनलाईन सबमिट करायची होती. सिंधुदुर्ग जिल्हयातील कणकवली कलमठ येथील रहिवासी सौ.आरती मकरंद वायंगणकर – कांबळी यांनी पाठविलेल्या रेसिपीला राज्यात द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आहे. आरती वायंगणकर -कांबळी या पंचायत समिती मालवण येथे विषयतज्ञ म्हणून कार्यरत आहेत. आरती यांनी या स्पर्धेत कोकणातील रस खापरोळी रेसिपीचा व्हिडीओ पाठविला होता. महाराष्ट्रातून साधारणपणे एक हजारच्या वर रेसिपी व्हिडीओ प्राप्त होते. त्यामध्ये कोकणातील रस खापरोळी या रेसिपचा द्वितीय क्रमांक आला आहे. 27 सप्टेंबर 2021 रोजी जागतिक पर्यटन दिन निमित्त आयोजित कार्यक्रमात महाराष्ट् राज्याचे मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांच्या हस्ते दहा हजाराचा धनादेश व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते. आरती यांच्या या यशाबद्दल सर्वच क्षेत्रातून त्यांचे कौतुक होत आहे. फोटो ओळ:-आरती वायंगणकर-कांबळी हिचा सत्कार करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सोबत उपमुख्यमंत्री अजित पवार व अन्य २)बनविलेली कोकणची रस खापरळी
