Headlines

वैभववाडी शहरातील डॉ. उदय पाटील यांना पितृशोक

*⚡वैभववाडी ता.०७-:* सेवानिवृत्त मुख्याध्यापक व कुर्ली गावचे रहिवासी वामन परशुराम पाटील (गुरुजी) वय 91 यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. वैभववाडी शहरातील प्रमुख तज्ञ डॉक्टर उदय पाटील यांचे ते वडील होतं. उपक्रमशील व आदर्श शिक्षक अशी पाटील गुरुजी यांची ओळख होती कणकवली तालुक्यात वाघेरी, ओझरम, वारगाव, हरकुळ बुद्रुक व हळवल या ठिकाणी त्यांनी प्राथमिक शिक्षक म्हणून…

Read More

प्रवीण दळवी यांनी दिल्या घरी सुखी रहावे

काँग्रेस जिल्हा सरचिटणीस महिंद्र सावंत यांचा टोला *⚡कणकवली ता.०७-:* राष्ट्रीय काँग्रेस चे कळसुली विभागीय अध्यक्ष प्रवीण दळवी यांनी भाजप मध्ये प्रवेश केला हे माध्यमातून समजले. वास्तविक प्रवीण दळवी हे तीन वर्षापूर्वी अध्यक्ष होते. आता ते माजी अध्यक्ष आहेत.नवीन कमिटीत त्यांचे व इतर बूथ अध्यक्षाचे नाव ही नाही. त्यामुळे काँग्रेसला धक्का लागायचे राहिले दूरच. जरा सुद्धा…

Read More

मनसे जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर यांना 12 ऑक्टोबर रोजी श्रद्धांजली वाहणार

*⚡कणकवली ता.०७-:* महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष राजन दाभोळकर यांचे 6 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 वाजता दीर्घ आजाराने निधन झाले.राजन दाभोलकर यांना श्रद्धांजली व शोकसभेचे आयोजन मंगळवार 12 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.30 वाजता मातोश्री मंगल कार्यालय कणकवली येथे करण्यात आलेले आहे. राजन दाभोलकर यांच्या या अकस्मित जाण्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिंधुदुर्ग संघटनेचे मोठे नुकसान झाले…

Read More

बेळणे पावणादेवी मंदिरापर्यंत रस्त्यासाठी निधी द्या

सरपंच , उपसरपंच यांची आमदार नितेश राणेंकडे मागणी *⚡कणकवली ता.०७-:* कणकवली तालुक्यातील मुंबई गोवा हायवेपासून बेळणे पावणादेवी मंदिरपर्यंतच्या रस्त्यासाठी स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत निधी देण्याची मागणी बेळणे सरपंच दिक्षा चाळके यांनी आमदार नितेश राणे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. बेळणे गावचे ग्रामदैवत असलेल्या पावणाई मंदिरापर्यंत डांबरी रस्ता होण्यासाठीचा परिपूर्ण प्रस्ताव बेळणे ग्रामपंचायत मार्फत वरिष्ठ स्तरावर प्रशासनाकडे…

Read More

दांडेलीतील रस्त्याच्या दुतर्फा आलेली झुडपे धोकादायक

रानटी प्राण्यांचा रात्रीच्या वेळी रस्त्यावर वावर *⚡बांदा ता.०७-:* सावंतवाडी-आरोस मार्गावरील दांडेली गावात रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या भल्यामोठ्या झुडपांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. दांडेली ग्रामपंचायतने याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे लेखी पत्राद्वारे लक्षही वेधले आहे. तर येत्या आठ दिवसांत रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झुडपे न तोडल्यास आक्रमक पवित्रा घेण्याचा इशारा भाजप कार्यकर्ते संदीप माणगावकर यांनी दिला आहे. दांडेली गावातून…

Read More

कळसुलीतील कॉग्रेस, शिवसेनेना कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

आमदार नितेश राणे यांनी केले स्वागत *⚡कणकवली ता.०७-:* कणकवली तालुक्यातील कळसुली मधील शिवसेना काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी आज आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत कणकवलीतील ओम गणेश निवासस्थानी भाजपामध्ये प्रवेश केला. हा सत्ताधारी शिवसेना, कॉग्रेस ला धक्का मानला जात आहे. आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत प्रवेश केल्याचे या कार्यकर्त्यांनी या प्रसंगी सांगितले. यावेळी कळसुली मधील…

Read More

कणकवलीत शिवसेनेच्या वतीने दुर्गामातेची प्रतिष्ठापना

आ.वैभव नाईक यांच्या हस्ते देवीचे विधिवत पूजन व आरती *⚡कणकवली ता.०७-:* कणकवली तालुका शिवसेनेच्यावतीने शिवसेना शाखेसमोर घटस्थापने दिवशी श्री.दुर्गामातेची प्रतिष्ठापना करण्यात आली.कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते देवीचे विधिवत पूजन व आरती करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. देवीच्या आसनाला आकर्षक फुलांची सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. देवीची सवाद्य मिरवणूक…

Read More

चिपी विमानतळाचे उद्घाटन बंद खोलीत दडून नको…

*⚡सावंतवाडी ता.०७- :* केंद्रीय मंत्री खा. नारायण राणे यांनी केलेल्या प्रयत्नाला मुर्त स्वरूप ९ तारीखला येत आहे. त्यामुळे चिपी विमानतळाच उद्घाटन बंद खोलीत, दडून न करता ओपन जंगी स्वरूपात व्हाव अशी मागणी प्रशासनाला केली आहे. या जिल्ह्याच्या विकासासाठी ज्या प्रसंगाची जिल्हावासिय वाट पाहत होते, तो प्रसंग आज आलेला आहे. येथील ग्रामस्थांना, जिल्हावासियांना आनंदोत्सव साजरा करण्यासाठीचा…

Read More

भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे यांना पितृशोक एडगावचे माजी सरपंच पुंडलिकराव रावराणे यांचे दुःखद निधन

एडगावचे माजी सरपंच पुंडलिकराव रावराणे यांचे दुःखद निधन वैभववाडी प्रतिनिधी वैभववाडी तालुक्यातील एडगाव गावचे माजी सरपंच पुंडलिकराव रामकृष्ण रावराणे वय 87 यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे यांचे ते वडील होतं. पुंडलिकराव रावराणे सन 1965 मध्ये एडगाव या गावचे पहिल्यांदा उपसरपंच झाले. 1970 मध्ये एडगाव…

Read More

वेंगुर्ल्यात ठिकठिकाणी नवरात्रोत्सवाला प्रारंभ

*⚡वेंगुर्ला ता.०७-:* वेंगुर्ला तालुक्यातील ठिकठिकाणच्या मंदिरांमध्ये तसेच सार्वजनिक ठिकाणी पारंपारिक पद्धतीने आज शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला आहे. गतवर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर छोटेखानी उत्सव केला होता. मात्र, यावर्षी कोरोना प्रतिबंधात्मक अटी व नियम पाळून भाविकांना मंदिरात जाता येणार असल्याने त्यांच्यात उत्साहाचे वातावरण आहे. वेंगुर्ला शहरामध्ये सातेरी, रवळनाथ, पूर्वस, भराडी, भगवती, गुणादेवी, केपादेवी, तांबळेश्वर-भगवती तर तालुक्यामध्ये वेतोरे, मातोंड,…

Read More
You cannot copy content of this page