वैभववाडी शहरातील डॉ. उदय पाटील यांना पितृशोक

*⚡वैभववाडी ता.०७-:* सेवानिवृत्त मुख्याध्यापक व कुर्ली गावचे रहिवासी वामन परशुराम पाटील (गुरुजी) वय 91 यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. वैभववाडी शहरातील प्रमुख तज्ञ डॉक्टर उदय पाटील यांचे ते वडील होतं. उपक्रमशील व आदर्श शिक्षक अशी पाटील गुरुजी यांची ओळख होती कणकवली तालुक्यात वाघेरी, ओझरम, वारगाव, हरकुळ बुद्रुक व हळवल या ठिकाणी त्यांनी प्राथमिक शिक्षक म्हणून सेवा बजावली होती. हळवल येथील शाळेत कार्यरत असताना ते वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले होते. काही दिवस त्यांची प्रकृती ठीक नव्हती. वैभववाडी येथील निवासस्थानी दुपारी त्यांचे निधन झाले. आज सायंकाळी कुर्ली येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

सेवानिवृत्त मुख्याध्यापक वामन पाटील यांचे निधन

You cannot copy content of this page