दांडेलीतील रस्त्याच्या दुतर्फा आलेली झुडपे धोकादायक

रानटी प्राण्यांचा रात्रीच्या वेळी रस्त्यावर वावर

*⚡बांदा ता.०७-:* सावंतवाडी-आरोस मार्गावरील दांडेली गावात रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या भल्यामोठ्या झुडपांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. दांडेली ग्रामपंचायतने याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे लेखी पत्राद्वारे लक्षही वेधले आहे. तर येत्या आठ दिवसांत रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झुडपे न तोडल्यास आक्रमक पवित्रा घेण्याचा इशारा भाजप कार्यकर्ते संदीप माणगावकर यांनी दिला आहे. दांडेली गावातून बांदा-शिरोडा व सावंतवाडी-आरोस मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक रात्रंदिवस सुरू असते. दोन्ही मार्ग दांडेली गावातून जातात. रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या झाडांमुळे अचानक रानटी जनावरे समोर येऊन अपघात घडल्याचे काही ग्रामस्थांनी सांगितले. परंतु याची दखल सार्वजनिक बांधकाम विभाग कायम उशिराने घेते, अशा अपघातात एखादा बळी गेल्यावरच प्रशासनाला जाग येणार का असा सवाल संदीप माणगावकर यांनी केला. दरम्यान, ग्रामस्थांना भेडसावणारी समस्या लक्षात घेत तात्काळ दांडेली ग्रामपंचायतने सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र देऊन सदर धोकादायक झाडी सफाई करण्याची मागणी केली आहे. समोरून येणारे वाहन दिसत नसल्याने कोणतीही जीवित वा वित्तहानी होण्याअगोदर धोकादायक झुडपे हटवावी असे लेखी पत्र सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडी यांना दिल्याचे सरपंच दादा पालयेकर यांनी सांगितले.

You cannot copy content of this page