चिपी विमानतळाचे उद्घाटन बंद खोलीत दडून नको…

*⚡सावंतवाडी ता.०७- :* केंद्रीय मंत्री खा. नारायण राणे यांनी केलेल्या प्रयत्नाला मुर्त स्वरूप ९ तारीखला येत आहे. त्यामुळे चिपी विमानतळाच उद्घाटन बंद खोलीत, दडून न करता ओपन जंगी स्वरूपात व्हाव अशी मागणी प्रशासनाला केली आहे. या जिल्ह्याच्या विकासासाठी ज्या प्रसंगाची जिल्हावासिय वाट पाहत होते, तो प्रसंग आज आलेला आहे. येथील ग्रामस्थांना, जिल्हावासियांना आनंदोत्सव साजरा करण्यासाठीचा हा दिवस असणार असून जिल्हावासियांनी मोठ्या प्रमाणात या उद्घाटन प्रसंगी उपस्थित रहावे असे आवाहन भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केले आहे. दरम्यान, प्रशासनानं प्रत्येक पक्षाच्या पाच जणांनी उद्घाटनासाठी उपस्थित रहावे असे अध्यादेश जारी केले असून स्थानिक सरपंचांना देखील या उद्घाटन प्रसंगी निमंत्रित केलेल नाही. स्थानिकांनी या विमानतळासाठी जागा दिल्या असून या ऐतिहासिक सोहळ्यात स्थानिकांना देखील सहभागी करून घ्यावे असं मत तेली यांनी व्यक्त केले. तर या ठिकाणी रोजगारासाठी स्थानिक लोकांना सामावून घ्यावं यासाठी भारतीय जनता पार्टी आग्रही असणार आहे. विमानतळाच श्रेय घेणारे रस्ता, पाणी, वीज यासारख्या मूलभूत गरजा देखील पुर्ण करू शकलेले नाही. श्रेय घेण्यात मात्र राज्यसरकारचा पुढाकार आहे. स्थानिक खासदार, आमदार तेच आहेत मात्र काम होऊ शकलेली नाहीत, फक्त पालकमंत्री बदलले असा टोला देखील यावेळी लगावला. तर विमानतळावर शिवसेनेच्या शाखेत होणाऱ्या बैठकांसारख्या बैठका होत असून येथील टेंडर स्थानिक लोकांना न देता लोकप्रतिनिधींच्या नातेवाईकांना देण्यात आली आहेत असा आरोप केला. यावेळी नगराध्यक्ष संजू परब, नगरसेवक मनोज नाईक, महेश पांचाळ आदी उपस्थित होते.

भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचे आवाहन

You cannot copy content of this page