*⚡वेंगुर्ला ता.०७-:* वेंगुर्ला तालुक्यातील ठिकठिकाणच्या मंदिरांमध्ये तसेच सार्वजनिक ठिकाणी पारंपारिक पद्धतीने आज शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला आहे. गतवर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर छोटेखानी उत्सव केला होता. मात्र, यावर्षी कोरोना प्रतिबंधात्मक अटी व नियम पाळून भाविकांना मंदिरात जाता येणार असल्याने त्यांच्यात उत्साहाचे वातावरण आहे. वेंगुर्ला शहरामध्ये सातेरी, रवळनाथ, पूर्वस, भराडी, भगवती, गुणादेवी, केपादेवी, तांबळेश्वर-भगवती तर तालुक्यामध्ये वेतोरे, मातोंड, दाभोली, अणसूर यांसह इतर देवीच्या मंदिरांमध्ये नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला आहे. तर मातोश्री कला क्रिडा मंडळ, शिवसेना कार्यालय, कॅम्प कॉर्नर आणि तांबळेश्वर-भगवती मित्रमंडळ गाडीअड्डा येथे नवदुर्गेचे पूजन करण्यात आले आहे. वेंगुर्ल्याचे ग्रामदैवत श्री देवी सातेरी मंदिरात रोज देवीच्या नऊ रुपांची पूजा बांधण्यात येणार असून आज पहिल्या दिवशी देवीची गजांन्तलक्ष्मीची पूजा बांधण्यात आली.
वेंगुर्ल्यात ठिकठिकाणी नवरात्रोत्सवाला प्रारंभ
