Headlines

डिझेल दरवाढीमुळे मच्छिमार अडचणीत…

खास. नारायण राणे गप्प का..?:हरी खोबरेकर यांचा सवाल.. ⚡मालवण ता.२४-: गेले काही वर्षे मत्स्य दुष्काळजन्य परिस्थिती असताना आता डिझेलचे दर वाढल्यामुळे मच्छीमारांसमोर मच्छिमारी व्यवसाय कसा करावा हा प्रश्न पडला आहे, असे असताना येथील खासदार असणारे आणि स्वतःला कोकणचे भाग्यविधाते म्हणवणारे खासदार नारायण राणे हे डिझेल दरवाढी विरोधात गप्प का आहेत, डिझेल दरवाढी बाबत खास. राणे…

Read Full News

आचरा येथे कासवाच्या पिल्लांना समुद्रात सोडले…

⚡मालवण ता.२४-:आचरा पिरावाडी गोल्डन बीच येथे ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवाच्या ५५ पिल्लांना कासव मित्र तथा बीच मॅनेजर सूर्यकांत धुरी, पिरावाडी पोलीस पाटील सौ. तन्वी जोशी ग्रा.प. सदस्य सौ. पूर्वा तारी यांच्या हस्ते समुद्रात सोडण्यात आले. यावेळी आचरा पोलीस ठाण्याच्या पोलीस कॉन्स्टेबल तन्वी माणगावकर, प्रज्ञा गावकर, होमगार्ड विनय घाडीगावकर, ग्रामस्थ अरुण नावगे, नंदा नावगे तसेच पर्यटक…

Read Full News

नांदगाव – असलदे येथे महामार्ग रोखत ठिय्या आंदोलन केल्याप्रकरणी ३७ जणांवर गुन्हे दाखल…

⚡कणकवली ता.२४-: आंबा, काजू बागायतदारांच्या नुकसान भरपाईच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आंबा बागायतदार शेतकऱ्यांनी नांदगाव – असलदे येथे ठिय्या मारत सोमवारी महामार्ग रोखला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी मनाई आदेश लागू केलेला असताना बेकायदेशीर जमाव जमवून रस्ता रोखला. तसेच आक्षेपार्ह भाष्य करून जमावाला भडकविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी कणकवली पोलिसांनी माजी खासदार राजू शेट्टी, माजी…

Read Full News

नांदगाव आंदोलनादरम्यान वागदे डंगळवाडी येथे टायर जाळण्याची घटना ; अज्ञातावर गुन्हा…

⚡कणकवली ता.२४-: नांदगाव येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या रास्ता रोको आंदोलनादरम्यान वागदे डंगळवाडी येथे अज्ञात व्यक्तीकडून चारचाकी वाहनाचे तीन टायर जाळून मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर अडथळा निर्माण करण्यात आला. या कृत्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन मानवी जीवितास धोका निर्माण झाला. गोपनीय मदतनिस सागर बाबुराव जाधव (कणकवली पोलीस ठाणे) यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत…

Read Full News

कोंडये येथे शेतमांगर फोडून सुमारे ३.२० लाखांच्या काजू बियांची चोरी…

⚡कणकवली ता.२४-: कणकवली तालुक्यातील कोंडये वरचीवाडी येथे शेतमांगराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ३ लाख २० हजार रुपये किमतीच्या काजू बियांची चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत दत्तात्रय विठ्ठल तेंडुलकर (वय ७६, व्यवसाय शेती, रा. कोंडये वरचीवाडी, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग) यांनी कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तेंडुलकर यांचे राहते घर कोंडये वरचीवाडी…

Read Full News

वेंगुर्ला – निवती पोलीस स्थानकाच्या वतीने सागर कवच अभियानास प्रारंभ…

⚡वेंगुर्ला ता.२४-: शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या सागर कवच अभियान 1/ 2026वेंगुर्ला पोलीस स्थानकाच्या वतीने मंगळवारी सकाळी 6 वाजता राबविण्यास प्रारंभ करण्यात आला. जिल्हापोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर व अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविण्यात येत आहे. वेंगुर्ला पोलीस ठाणे हद्दीत कोंडूरा हरिचरणगिरी ते रेडी पोर्ट – तेरेखोल संपूर्ण सागरी भूभागात हे सागर कवच…

Read Full News

गोविंद नाईक यांचे निधन…

कुडाळ : तालुक्यातील नेरूर कांडरीवाडी येथील शेतकरी गोविंद वासुदेव नाईक वय 75 याचे सोमवारी (ता23) सायंकाळी झाडावरून पडून दुःखद निधन झाले.ते आपल्या घरासमोर शेतात असणाऱ्या झाडावर चढले होते. त्याचवेळी त्यांचा तोल जाऊन पडले आणि दुखःद निधन झाले. नेरूर परिसरात ते काका नाईक नावाने परिचित होते. कॉनबॅकचे कर्मचारी मंगेश नाईक यांचे वडील तर पत्रकार अजय सावंत…

Read Full News

कणकवली कलमठ नाडकर्णी नगरला नगरपंचायतीचे स्वच्छ पाणी मिळणार..

नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्याकडून तात्काळ उपाययोजनांची ग्वाही.. ⚡कणकवली ता.२४-: कलमठ नाडकर्णी नगरला कणकवली नगरपंचायतीचे पाणी मिळणार असल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले आहे. कणकवली नगरपंचायतीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या सहकार्याने आणि कलमठचे सरपंच संदीप मेस्त्री यांच्या प्रयत्नामुळे हे शक्य होणार आहे. कणकवली तालुक्यातील कलमठ गावातील नाडकर्णी नगरला गेले काही दिवस अस्वच्छ पाणी पुरवठा होत होता. याशिवाय पाण्याच्या…

Read Full News

सावंतवाडी नगरपरिषदेत कामगार हिताचा मोठा निर्णय…

२२ वारसांना अनुकंपा तत्वावर नोकरी: प्रभारी नगराध्यक्षांनी मानले आभार.. सावंतवाडी : नगरपरिषदेच्या सभेत मंगळवारी अत्यंत महत्त्वाचा आणि कामगारहिताचा निर्णय एकमताने मंजूर करण्यात आला. लाड पांगे समितीच्या शिफारसीनुसार सफाई कामगारांच्या २२ वारसांना नगर परिषदेच्या आस्थापनेवर अनुकंपा तत्वावर नेमणूक देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या संदर्भात सभागृहात ठेवण्यात आलेल्या ठरावाला सर्वांनी एकमताने मंजुरी दिल्याने सभेचे अध्यक्ष असलेल्या…

Read Full News

सावंतवाडीतील श्री एकमुखी दत्त मंदिरात २ एप्रिलला भव्य कलशारोहण सोहळा…

⚡सावंतवाडी ता.२४-: सावंतवाडी- सबनिसवाडा येथील ११० वर्ष पूर्ण झालेल्या श्री एकमुखी दत्त मंदिर व वासुदेवानंद सरस्वती मंदिर येथे येत्या गुरुवारी २ एप्रिल २०२६ चैत्र शुद्ध पौर्णिमाला भव्य ‘कलशारोहण सोहळा’ आयोजित करण्यात आला आहे. देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमितीतर्फे या निमित्ताने ३० मार्च ते २ एप्रिल या कालावधीत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती…

Read Full News

You cannot copy content of this page