अहिल्याबाई होळकर यांचे कार्य सदैव दिशादर्शक : प्रसन्ना देसाई…

⚡वेंगुर्ला ता.३१-: पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त वेंगुर्ला तालुका भाजपा कार्यालयात प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हा उपाध्यक्षा व नगरसेवीका अँड. सुषमा प्रभूखानोलकर यांनी कुशल प्रशासक, पराक्रमी विरांगणा पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करताना त्या आदर्श राजमाता व अष्टपैलु राज्यकर्ता असल्याचे सांगितले. तसेच अहिल्यादेवी शिवभक्त होत्या. शिवाचे अस्तित्व सगळीकडे आहे, असे त्या मानत. मल्हारराव होळकर यांच्यासारखे अहिल्यादेवींना एक श्रेष्ठ गुरु, मार्गदर्शक मिळाल्याने राज्यकारभारात त्या निपुण झाल्या. या आधारावरच अहिल्यादेवींनी माळव्या प्रांतावर सुराज्य केले. तब्बल २९ वर्षे माळवा प्रांतावर लोककल्याणकारी राज्य केले .अहिल्यादेवींनी रयतेच्या काळजीपोटी अनेक गोष्टी केल्या. त्यांनी अनेक विधवांना पतीची मिळकत त्यांच्यापाशीच ठेवण्यात मदत केली. त्यांच्या राज्यात कोणतीही विधवा दत्तकपुत्र होऊ शकत असे. अहिल्यादेवी होळकर या एक खरोखरच विस्तृत राजकीय दृश्यपटलाच्या एक सुक्ष्म अवलोकनकर्त्या होत्या, अशा पध्दतीत त्यांना अभिवादन करण्यात आले.यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती कार्यक्रम समीतीचे जिल्हा संयोजक प्रसन्ना उर्फ बाळु देसाई ,मंडल अध्यक्ष विष्णु उर्फ पप्पू परब, जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, वेंगुर्ला उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, नगरसेवक सचिन शेट्ये, सदानंद गिरप, चिटणीस चेतना रजपूत, नगरसेविका काजल कुबल, आकांक्षा परब, गौरी माईणकर, शीतल आंगचेकर, महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष
वृंदा गवंडळकर, चिटणीस प्रणाली खानोलकर, तालुका सरचिटणीस वसंत तांडेल आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page