वेंगुर्ला तालुक्यात 15 दिवसात 2 दुचाकी चोरीस…

नागरिकांनी विशेष दक्षता घ्यावी ; PI निसर्ग ओतारी..

⚡वेंगुर्ला ता.३१-: वेंगुर्ला तालुक्यात 16 मे ते
29 मे या कालावधीत 2 दुचाकी चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे तालुक्यात एकच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वेंगुर्ला पोलिसांमार्फत योग्यरीतीने तपास सुरु असून तालुक्यातील तसेच शहरातील नागरिकांनी विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन वेंगुर्ला पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी व पोलीस उपनिरीक्षक शेखर दाभोलकर यांनी केले आहे.
१६ मे रोजी रात्री ९ वा. ते १७ मे रोजी सकाळी ६.३० वा. या मुदतीत मठ कणकेवाडी येथील रहिवासी नवीन मधुकर गावडे यांची वेंगुर्ला परबवाडा येथील मित्र प्रवीण पाणकर यांच्या घराच्या बाजूला रस्त्याच्या कडेला पार्क केलेली काळ्या रंगाची स्प्लेंडर प्लस (एमएच ०७ जे २३६५) ही मोटारसायकल अज्ञाताने चोरून नेली आहे. त्यानंतर गुरुवारी २८ मे रोजी रात्री १२ वा. ते शुक्रवारी २९ मे रोजी सकाळी ६ वा. या मुदतीत मोचेमाड वरची नाबरवाडी येथील रहिवासी उदय पुंडलिक नाबर यांच्या मालकीची राहत्या घरासमोर लावलेली पांढऱ्या रंगाची दुचाकी ( क्र.एमएच 07 एएल 4265) चोरीस गेली आहे. दरम्यान दोन्ही चोरीबाबत फिर्यादी दाखल करण्यात आल्या असून अज्ञात व्यक्तीविरोधात चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वेंगुर्ला पोलिसांनी मागील कालावधीत आरवली, वेंगुर्ला कॅम्प पॉवर हाऊस आदी ठिकाणच्या दुचाकी चोरीचा तातडीने शोधण्यात यश मिळविले आहे. दरम्यान याच आठवड्यात एक चोरीस गेलेली दुचाकी आढळून आली असून याबाबत पोलिसात कोणतीही फिर्याद दाखल नाही.

You cannot copy content of this page