विधान परिषदेसाठी अतुल काळसेकर उद्या अर्ज भरणार..?

सिंधुदुर्गात चर्चांना उधाण: उद्याच्या घडामोडीवर संपूर्ण जिल्हा वासियांचे लक्ष..

⚡सिंधुदुर्ग ता.३१-: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर हे विधान परिषद निवडणुकीसाठी उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची जोरदार चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे. उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे

महायुतीमधून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुटल्याचे बोलले जात असून त्या पार्श्वभूमीवर अतुल काळसेकर यांच्या नावाची चर्चा अधिक रंगू लागली आहे. जिल्ह्यातील सहकार आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेल्या काळसेकर यांच्या संभाव्य उमेदवारीमुळे राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.
दरम्यान, अधिकृत पातळीवर कोणतीही घोषणा करण्यात आलेली नसली तरी उद्या शेवटच्या दिवशी नेमक्या कोणत्या राजकीय घडामोडी घडतात, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.

You cannot copy content of this page