पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी…

⚡वैभववाडी ता.०१-: धनगर समाज विचारमंच सिंधुदुर्ग यांच्या वतीने ओरस सिंधुदुर्ग येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी विचार मंचचे अध्यक्ष एकनाथ जानकर,माजी पोलिस उपनिरीक्षक बापु खरात,भवन समिती अध्यक्ष कानु शेळके,माजी गटविकास अधिकारी आर डी जंगले,माजी नायबतहसीलदार गंगाराम कोकरे, विठ्ठल खरात नवलराज काळे,पांडूरंग काळे,देऊ जंगले, लक्ष्मण शेळके, संतोष साळसकर, रामचंद्र डोईफोडे, संतोष बोडके,धिरज हुंबे, संतोष गुरखे,आदी संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धनगर समाज बांधव मोठे संख्येने उपस्थित होते.
यावेळी संपूर्ण जिल्ह्यातून प्रतेक तालुक्यातील एका कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला यामध्ये सौ विशाखा नवलराज काळे सुवर्णा झोरे,सौ दिपा ताटे,दर्शना जंगले, स्वप्नाली शेळके माजी सरपंच सौ वरक आदींचा सत्कार करण्यात आला.

You cannot copy content of this page