Headlines

कलमठ येथे हयात दाखला शिबिरामध्ये ७० लाभार्थ्यांना हयातीच्या दाखल्यांचे वितरण…

मुख्यमंत्री समृद्ध पंचायराज अभियान अंतर्गत आयोजन:ग्रामपंचायत कलमठ व ग्राम महसूल कार्यालयचे आयोजन.. ⚡कणकवली ता.२४-: मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या सुशासन युक्त प्रशासन संकल्प अंतर्गत कलमठ गावातील विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांसाठी ग्रामपंचायत कलमठ आणि ग्राम महसूल कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हयात दाखल्यांच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना आणि दिव्यांग योजना…

Read Full News

कुडाळ मध्ये लवकरच मोफत वैकुंठ रथ सेवा…

ओंकार तेली यांचा पुढाकार:आम. निलेश राणे यांच्या हस्ते होणार लवकरच लोकार्पण.. ⚡कुडाळ ता.२४-: मृत्यू नंतर दुःखाच्या क्षणी आर्थिक ओझे कमी करून अंतिम प्रवास सन्मानाने पार पाडता यावा, यासाठी कुडाळ शहरात मोफत वैकुंठ रथ सेवा सुरु लवकरच करण्यात आहे. कुडाळातील प्रसिद्ध व्यापारी कै. सुधीर राजाराम तेली यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांचे चिरंजीव ओंकार तेली यांच्या सहकार्याने हा उपक्रम…

Read Full News

सावंतवाडी नगरपरिषद ठेकेदारांची दुकान चालवतात…

तौकीर शेख यांचा गंभीर आरोप:तर गॅस पाईपलाईन कामावरून संजू परब आक्रमक, दोषींवर कारवाईचे प्रशासनाचे आश्वासन.. ⚡सावंतवाडी ता.२४-: सावंतवाडी नगरपरिषदेत ठेकेदारीची दुकान चालवत असल्याचा गंभीर आरोप कॉग्रेसचे नगरसेवक तौकीर शेख यांनी केला. ठेकेदारांच्या संभाषणाचा पुरावा देत त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. तसेच माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी गॅस पाईपलाईनच्या कामावरून अधिकाऱ्यांना झापल. यावेळी प्र. नगराध्यक्ष ॲड अनिल…

Read Full News

पाणी पाईपलाईन टाकण्याचं काम बोगस पद्धतीने सुरू…

सुरेश भोगटे यांचा आरोप:ठेकेदार प्रशासनाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करत असल्याचा ही केला आरोप.. ⚡सावंतवाडी ता.२४-: शहरातील माठेवाडा ते वैश्यवाडा, गवळी तिठा परिसरात सुरू असलेल्या पाणी पाईपलाईन टाकण्याच्या कामामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत असून संबंधित ठेकेदाराकडून बोगस पद्धतीने काम सुरू असल्याचा आरोप माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी आज येथे केला ते म्हणाले, या कामासाठी…

Read Full News

*“सिंधुदुर्गच्या प्रगतीसाठी तंत्रज्ञान हाच खरा मार्ग”…

जि.प.अध्यक्ष प्रमोद कामत:भोसले नॉलेज सिटीमध्ये ‘क्वांटेक्झेरा २०२६’ चा भव्य शुभारंभ… ⚡सावंतवाडी ता.२४-:भोसले नॉलेज सिटी, सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये आज राष्ट्रीय स्तरावरील ‘क्वांटेक्झेरा २०२६’ या तांत्रिक महाउत्सवाचे अत्यंत उत्साहात आणि दिमाखात उद्घाटन करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष…

Read Full News

नळपाणी कामादरम्यान गॅस पाईपलाईन फुटली….

⚡सावंतवाडी ता.२४-: शहराच्या सीमेवर नळपाणी योजनेचे काम सुरू असताना गॅस पाईपलाईन फुटली. यामुळे मोठ्या प्रमाणात गॅस बाहेर पडला. मात्र, नॅचरल गॅस असल्याने धोका नसल्याचे ठेकेदाराने सांगितले. मोरडोंगरी भागात ही घटना घडली. पाणी पुरवठा योजनेची लाईन खोदताना गॅस पाईपलाईन फुटण्याचा प्रकार घडला. यावेळी नगरपरिषदेचा कर्मचारी दिसून आले नाहीत. उपस्थित ठेकेदारांनी नगरपरिषद कर्मचारी इथे नसल्याचे सांगितले. तर…

Read Full News

केसरकरांच्या राजीनाम्यासाठी ठाकरे शिवसेनेचा सावंतवाडीत भव्य मोर्चा..

भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात केसरकर हे खरे सूत्रधार: त्यांची एसआयटी मार्फत चौकशी करा ;रुपेश राऊळ यांची मागणी .. ⚡सावंतवाडी, ता. २४ -: आमदार दीपक केसरकर यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सावंतवाडीतील ठाकरे शिवसेनेने भव्य मोर्चा काढत त्यांच्या विरोधात जोरदार निषेध व्यक्त केला. भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात केसरकर यांचे नाव समोर आल्यामुळे सावंतवाडीची बदनामी झाल्याचा आरोप…

Read Full News

सामाजिक बांधिलकीच्या रुग्णवाहिकेसाठी ४५ हजारांची देणगी…

कै. प्रशांत अळवणी व कै. बाळकृष्ण नाईक यांच्या स्मरणार्थ दात्यांकडून मदतीचा हात.. ⚡सावंतवाडी ता.२४-: सामाजिक बांधिलकी जपत रुग्णसेवेसाठी उभारण्यात येणाऱ्या रुग्णवाहिकेसाठी विविध दात्यांकडून मदतीचा ओघ सुरू असून अलीकडेच एकूण ४५ हजार रुपयांची देणगी संस्थेकडे सुपूर्त करण्यात आली.शशिकला अळवणी परिवार, सावंतवाडी यांच्या वतीने कै. प्रशांत आत्माराम अळवणी यांच्या स्मरणार्थ २५ हजार रुपयांची देणगी देण्यात आली. तसेच…

Read Full News

बाळकृष्ण पेडणेकरचा “इंटरनॅशनल मास्टर” पर्णाली धारीयावर रोमहर्षक विजय…

राष्ट्रीय बुदधिबळ स्पर्धेत पटकावला चोविसावा क्रमांक..* ⚡सावंतवाडी ता.२४-: सातव्या ताराबाई शिंदे राष्ट्रीय बुदधिबळ स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आघाडीचा राष्ट्रीय बुदधिबळ खेळाडू बाळकृष्ण कौस्तुभ पेडणेकर याने चोवीसावा क्रमांक पटकावला. नेरुळ, नवी मुंबई येथील आगरी कोळी सांस्कृतिक भवनमध्ये रविवार दि.बावीस मार्च रोजी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. भारतातील विविध राज्यातील पाचशे वीस खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग घेतला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी…

Read Full News

दांडी बंधाऱ्याचे काम सुरु होत नसल्याने उबाठा शिवसेनेचे हेमंत मोंडकर यांचे उपोषण…

⚡मालवण ता.२३-:मालवण दांडी किनाऱ्यावरील श्रीकृष्ण मंदिर ते मोरेश्वर या बंधाऱ्यासाठी माजी आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर होऊन देखील तसेच प्रथम टप्प्यातील बंधाऱ्याच्या कामासाठी वर्कऑर्डर दिली गेली असतानाही राज्यातील सत्तांतरानंतर दोन वर्षे होऊन देखील सत्ताधाऱ्यांकडून या बंधाऱ्याच्या कामास सुरुवात करण्यात आली नसल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण उपशहरप्रमुख हेमंत मोंडकर यांनी…

Read Full News

You cannot copy content of this page