⚡सावंतवाडी ता.३१-: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती आज सावंतवाडी येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली. महाराष्ट्र भाजपा युवानेते विशालजी परब यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी भाजपा युवानेते विशालजी परब, विकास परब, सोशल मीडिया प्रमुख केतन आजगांवकर, सावंतवाडी शहर चिटणीस धिरेंद्र म्हापसेकर, श्रीकांत राजाध्यक्ष, साईप्रसाद भोई, साई नाईक, योगेश पेंडसे आदी उपस्थित होते. उपस्थितांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या आदर्श विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला.
