रुपेश राऊळ यांनी आमदार दीपक केसरकर यांची बदनामी करू नये; अन्यथा सर्व तुमच्या कुंडल्या बाहेर काढू…

संजू परब यांचा इशारा: पंचवीस वर्षे राजकारण करणाऱ्या व्यक्तीने स्वतःचा अधिकृत व्यवसाय जनतेसमोर मांडावा आणि त्यानंतरच दीपक केसरकर यांच्यावर बोलावे…

⚡सावंतवाडी ता.३१- : रुपेश राऊळ यांनी विनाकारण आमदार दीपक केसरकर यांची बदनामी करू नये, अन्यथा त्यांना उघडे पाडल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला आहे.

श्री परब पुढे बोलताना म्हणाले, रुपेश राऊळ यांनी दीपक केसरकर यांचे नाव घेऊन आरोप करण्याचे काम सुरू केले आहे. मात्र आजपर्यंत ते स्वतः केसरकर यांच्या जीवावरच राजकारण करून आपलं पोट भरत होते. उगाच आरोप करून काहीतरी मिळवणे, हाच त्यांचा धंदा असल्याची टीकाही त्यांनी केली.
तसेच, “गेली पंचवीस वर्षे राजकारण करणाऱ्या व्यक्तीने स्वतःचा अधिकृत व्यवसाय जनतेसमोर मांडावा आणि त्यानंतरच दीपक केसरकर यांच्यावर बोलावे. लोकांना सर्व माहिती आहे. त्यामुळे उगाच आम्हाला बोलायला भाग पाडू नये,” असेही परब यांनी म्हटले आहे.
यापुढेही विनाकारण आरोप सुरू ठेवल्यास रुपेश राऊळ यांची संपूर्ण कुंडली बाहेर काढू, असा इशाराही संजू परब यांनी दिला आहे. तसेच आडाळी एमआयडीसीतील माती चोरी प्रकरणात लवकरच तुम्हाला उद्योग मंत्र्यांकडून कारवाई केल्याचं पाहायला मिळेल असं देखील परब यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

You cannot copy content of this page