मंत्री प्रताप सरनाईक: आमदार दीपक केसरकर यांनी केले जंगी स्वागत..
सावंतवाडी ता.३१-: राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक सावंतवाडीत आले असता त्यांचे माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी स्वागत केले. यावेळी श्री. नाईक यांनी सावंतवाडी बस स्थानकाची देखील पहाणी केली. २० नव्या गाड्या सावंतवाडीला देणार असल्याची घोषणा देखील त्यांनी यावेळी केली.
मंत्री श्री. सरनाईक यांचे दीपक केसरकर यांनी स्वागत केले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, दोडामार्ग तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, सावंतवाडी तालुकाप्रमुख दिनेश गावडे, बबन राणे, शहरप्रमुख बाबू कुडतरकर, अशोक दळवी, सभापती सुस्मिता जाधव आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
