Headlines

कालावल खाडीतील वाळू उपशामुळे तळाशील गावाला धोका…

वाळू उपसा बंद न झाल्यास खाडीपात्रात आंदोलनाचा ग्रामस्थांचा इशारा.. ⚡मालवण ता.२३-:मालवण तालुक्यातील कालावल खाडीमधील शेलटी जेटी ते सर्जेकोट बंदर दरम्यान होणाऱ्या अनधिकृत वाळू उपशामुळे तळाशील गावाला धोका निर्माण झाला आहे, त्यामुळे हा वाळू उपसा तात्काळ बंद करावा तसेच सदर भागात वाळू उपशाचे अधिकृत टेंडर लावू नये, अशा मागण्या तळाशील ग्रामविकास मंडळातर्फे तळाशील ग्रामस्थांनी मालवणचे तहसीलदार…

Read Full News

देवगड येथे जागतिक पाणी दिवसानिमित्त आनंदवाडी जेट्टीवर यशस्वी स्वच्छता अभियान…

⚡देवगड,ता.२३-: जागतिक पाणी दिवस (२२ मार्च) च्या औचित्याने मत्स्यव्यवसाय विभाग, रिलायन्स फाउंडेशन आणि नगर पंचायत देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने आनंदवाडी जेट्टी येथे सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत विशेष स्वच्छता अभियान पार पडले. या अभियानात सुरक्षा रक्षक, सागर मित्र, स्थानिक मत्स्यव्यवसायी, नागरिक आणि स्वयंसेवकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. या कार्यक्रमाची रूपरेषा आणि नियोजन मत्स्यव्यवसाय विभागाचे अधिकारी…

Read Full News

सौंदाळे सडा भागात अग्नितांडव…

२०० ते २५० आंबा कलमे होरफळणी ; २५ हून अधिक आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान ⚡देवगड ता.२३-:देवगड तालुक्यातील पडेल ते पडेल रत्नागिरी सागरी मार्गालगत गुरव घरापासून सौंदाळे सडा भागात चार ते पाच किलोमीटर परिसरात दोनशे एकर क्षेत्रातील हापूस आंबा कलमांना आगीची झळ बसल्याने या वनव्यात 200 ते 250 पेक्षा जास्त आंबा कलमे होरपळून 25 हून अधिक…

Read Full News

कणकवलीतील सिंधुगर्जना पथकाचा आवाज सलग तिसऱ्या वर्षी निनादनार मध्यप्रदेश मध्ये…

रामनवमी निमित्त सिंधुगर्जनाचे २५० वे वादन मध्यप्रदेशातील टीकमगढ मध्ये.. ⚡कणकवली ता.२३-: एन. बी. एस चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सिंधुगर्जना ढोल ताशा पथक कणकवली रामनवमी निमित्त मध्यप्रदेश राज्यातील टिकमगढ येथे येत्या २७ मार्च रोजी २५०वे वादन करण्यासाठी आज सायंकाळी कणकवली रेल्वे स्थानकातून रवाना होणार आहे. यापुर्वी सिंधुगर्जना पथकाने ओडिशा, दिल्ली, मध्यप्रदेश, गोवा व महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये आपल्या…

Read Full News

वेंगुर्ला उपसभापती सचिन देसाई यांची कार्यतत्परता…

⚡वेंगुर्ला ता.२३-: वेंगुर्ला मठमार्गे सावंतवाडी या मुख्य मार्गांवर मठ कार्यक्षेत्रात अंडरग्राउंड विजवाहिन्याचे काम करण्यात येत आहे. दरम्यान मठ टाकयेवाडी व पेट्रोलपंप नजिक येथील दोन स्पॉटवर धोकादायक स्थितीमुळे वारंवार छोट्या वाहनांचे अपघात होत होते. याबाबत मठ येथील शिवसेना पदाधिकारी उमेश नाईक यांनी मठ सरपंच यांचे लक्ष वेधले होते. तसेच टाकयेवाडी येथील स्थानिक ग्रामस्थांनीही याबाबत शासनाचे लक्ष…

Read Full News

धनगर ST आरक्षण आंदोलनाला सिंधुदुर्गातून जोरदार प्रतिसाद…

⚡वैभववाडी ता.२३-: आझाद मैदान, मुंबई येथे दीपकभाऊ बोऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या धनगर ST आरक्षण आंदोलनाला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धनगर समाज बांधवांही सहभागी झाले होते.बापू खरात यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्गातील धनगर समाज बांधव उपस्थित राहून आपले प्रतिनिधित्व केले..सिंधुदुर्ग जिल्ह्यातून बापू खरात (कणकवली), सचिन हुंबे (वैभववाडी), संतोष साळसकर (देवगड), लक्ष्मण खरात (वैभववाडी), सुरेश…

Read Full News

श्रीराम नवमी निमित्त बांदा-पानवळ येथे भव्य धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन…

⚡बांदा ता.२३-: बांदा-पानवळ येथील श्रीराम पंचायतन मंदिर येथे गुरुवार दिनांक २६ रोजी श्रीराम नवमी उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवाचा लाभ भाविकांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन प.पू. रघुवीर महाराज यांनी केले आहे.उत्सवाची सुरुवात सकाळी ९ वाजता श्रीराम पूजन व अभिषेकाने होणार असून, सकाळी ९.३० ते १० या वेळेत श्रीराम जप…

Read Full News

कणकवली उपजिल्हा रुग्णालयात गर्भाशय कर्करोग प्रतिबंधक लसीकरणाचा शुभारंभ…

सभापती हर्षदा वाळके यांच्या हस्ते उद्घाटन.. ⚡कणकवली ता.२३-: उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे गर्भाशय कर्करोग प्रतिबंधक लसीकरण उपक्रमाचा शुभारंभ सोमवारी करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन कणकवली पंचायत समितीच्या सभापती हर्षदा वाळके यांच्या हस्ते झाले. या उपक्रमांतर्गत १४ वर्षे पूर्ण ते १५ वर्ष वयोगटातील मुलींसाठी लसीकरण शिबीर राबविण्यात येत असून, मुलींमध्ये गर्भाशयाच्या कर्करोगाबाबत जागरूकता निर्माण करून वेळेवर…

Read Full News

तांबळडेग येथील रस्त्याची दुरवस्था…

दक्षिण विकास मंडळाचे उपसभापती अमोल लोके यांना निवेदन.. ⚡देवगड ता.२३-:तांबळडेग गावातील अरविंद कुबल यांच्या घरापासून ते दक्षिणवाडा स्मशानभूमीपर्यंतच्या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली असून, हा रस्ता तातडीने खडीकरण, डांबरीकरण आणि रुंदीकरण करून मिळावा, अशी मागणी ‘दक्षिणवाडा विकास मंडळ (रजि.), तांबळडेग च्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात मंडळाने देवगड पंचायत समितीचे उपसभापती अमोल लोके यांना निवेदन देण्यात…

Read Full News

दीपक केसरकरांना टार्गेट करण्यापेक्षा रुपेश राऊळांनी मिलिंद नार्वेकरांच्या राजीनाम्याची मागणी करावी…

संजू परब यांचा टोला:१६ मत पडून दोनदा डिपॉझिट जप्त झालेल्यांवर आम्ही बोलत नाही, नाव न घेता साक्षी वंजारींना टोला.. ⚡सावंतवाडी ता.२३-: दीपक केसरकरांना केवळ टार्गेट करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी आमदार मिलिंद नार्वेकरांच्याही राजीनाम्याची मागणी करावी. तसेच भोंदूबाबा अशोक खरातला ४० किलोमीटरवरून पाणी पुरवणाऱ्या उद्धव ठाकरेंचाही निषेध नोंदवावा असा टोला शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी उद्धव बाळासाहेब…

Read Full News

You cannot copy content of this page