कुडाळात हॉटेल लेमनग्रास समोर अल्टो आणि टँकर मध्ये अपघात…

दोघे जण जखमी ; कारचे नुकसान.

कुडाळ : कुडाळ – सांगिर्डेवाडी येथे मुंबई-गोवा महामार्गावर शनिवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास टँकर आणि अल्टो कार यांच्यात जोरदार धडक होऊन अपघात झाला. या अपघातात अल्टो कारमधील दोघेजण किरकोळ जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
कणकवलीहून कुडाळच्या दिशेने जाणारा टँकर मिडलकटमधून वळत असताना कुडाळहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या अल्टो कारची त्याला धडक बसली. अपघातात कारचे मोठे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी धाव घेत मदतकार्य करून जखमींना रुग्णालयात दाखल केले. कुडाळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरू केला केला. अपघाता दरम्यान तेथील लेनवरील वाहतुकी काही काळ विस्कळीत झाली.

You cannot copy content of this page