मनविसेचा उद्या कणकवलीत जिल्हास्तरीय पदाधिकारी मेळावा…

⚡सावंतवाडी ता.३०-: ​महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने उद्या दुपारी ठीक ३.०० वाजता कणकवली येथील साई पॅलेस हॉलमध्ये जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांचा भव्य जिल्हास्तरीय मेळावा आयोजित करण्यात आला आहे.​या मेळाव्याला मनविसेचे सर्व उपजिल्हाध्यक्ष, तालुका संपर्क अध्यक्ष, तालुकाध्यक्ष, उपतालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, उपशहराध्यक्ष, विभागाध्यक्ष यांसह सर्वच प्रमुख पदाधिकाऱ्यांना आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वरिष्ठ पदाधिकारी या मेळाव्याला उपस्थित राहून मनविसेच्या कार्यकर्त्यांना संघटनात्मक मार्गदर्शन करणार आहेत. जिल्ह्यात मनविसेची संघटना अधिक सक्षम, गतिमान आणि बळकट करण्यासाठी हा मेळावा अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे. तरी सर्व पदाधिकाऱ्यांनी वेळेवर उपस्थित राहून मेळावा यशस्वी करावा, असे आवाहन मनविसेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष केतन सावंत यांनी केले आहे.

You cannot copy content of this page