⚡वैभववाडी ता.०३-: राज्य शैक्षणिक, संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे यांच्यामार्फत दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘आयडॉल टीचर पुरस्कार’ पीएमश्री दत्त विद्या मंदिर वैभववाडी चे मुख्याध्यापक दिनकर केळकर यांना जाहीर झाला आहे. त्यांच्या या निवडीमुळे वैभववाडी तालुक्यातील पीएमश्री दत्त विद्यामंदिर शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून संपूर्ण वैभववाडी तालुक्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
वैभववाडी तालुक्यातील पीएमश्री दत्त विद्यामंदिर शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून गेली वर्षभरात या शाळेनी तालुक्यासह जिल्ह्यात विभागापर्यंत चांगली मजल मारली आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेमध्ये या शाळेने जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवून विभागात तिसरा क्रमांक मिळाला आहे तर या शाळेचे मुख्याध्यापक दिनकर केळकर यांना सिंधुदुर्ग जिल्हा परिषद चा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे आणि आता यावेळी मुख्याध्यापक दिनकर केळकर यांना आयडल शिक्षक म्हणून ही पुरस्कार मिळाल्याने या शाळेच्या शिक्षकांनी व शाळेने तालुक्यासह जिल्ह्यात नाव उज्वल केले आहे यामुळे शाळेसह या शिक्षकांच्या वर संपूर्ण जिल्ह्यासह तालुक्यातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने केळकर यांचे अभिनंदन करण्यात आले त्यावेळी अध्यक्ष तेजस साळुंखे पत्रकार संदीप शिंदे सुषमा दळवी टकले मॅडम अहिल्या लांडगे धावले मॅडम अविनाश आवटे सर आधी पालक विद्यार्थी उपस्थित होते.
.

