Headlines

बांदा महिला मराठा समाजाच्या अध्यक्षपदी लक्ष्मी सावंत; सचिवपदी सुचिता धुरी यांची निवड..

उपाध्यक्षपदी ममता सावंत यांच्यासह कार्यकारिणी जाहीर…

⚡बांदा ता.०३-: बांदा येथील महिला मराठा समाजाच्या नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून अध्यक्षपदी सौ. लक्ष्मी राजाराम सावंत, उपाध्यक्षपदी सौ. ममता महादेव सावंत, तर सचिवपदी सौ. सुचिता सुशांत धुरी यांची निवड करण्यात आली आहे.
नूतन कार्यकारिणीत सदस्य म्हणून सौ. शिल्पा प्रसाद सावंत, सौ. सिद्धी सिताराम माजगावकर, सौ. कोमल लक्ष्मण चौगुले, सौ. सुशांती प्रवीण सावंत, सौ. रवीना राजन गडकरी, सोनल श्रीकृष्ण धुरी, सौ. सुचिता देवेश मुळीक, सौ. सिद्धी श्रीनिवास सावंत, सौ. मनाली बापू नाईक आणि सौ. स्वाती सावंत यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
महिला मराठा समाजाच्या माध्यमातून महिलांचे संघटन अधिक मजबूत करणे, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम राबविणे, महिलांच्या कलागुणांना वाव देणे तसेच समाजातील महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम आयोजित करण्याचा नूतन कार्यकारिणीचा मानस आहे.
नूतन पदाधिकाऱ्यांचे समाजाच्या विविध स्तरांतून अभिनंदन होत असून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत.

You cannot copy content of this page