Headlines

नगर वाचनालय संस्थेच्या विविध स्पर्धांचा निकाल जाहीर…

⚡वेंगुर्ला ता.०३-: नगर वाचनालय, वेंगुर्ला तर्फे 1 नोव्हेंबर रोजी श्रीकृष्ण स. सौदागर स्मृती पुरस्कृत वेंगुर्ला शहर व उभादांडा परिसरातील प्राथमिक शाळांसाठी वैयक्तिक व सामुहिक स्वरूपाच्या मराठी सांस्कृतिक स्पर्धा संपन्न झाल्या. यात विविध स्पर्धांमध्ये भाग्येश मोर्जे, रूद्र स्वार आणि परबवाडा शाळेने प्रथम क्रमांक पटकाविला.
स्पर्धांचा संक्षिप्त निकाल पुढीलप्रमाणे – इ.1ली ते 4थी वैयक्तिक गट-गीत गायन-प्रथम -भाग्येश मोर्जे (वेंगुर्ला नं.2), द्वितीय-श्लोक परब (परबवाडा शाळा), तृतीय-रघुवीर काणेकर (वेंगुर्ला नं.3), चतुर्थ-शर्वाणी आपटे (शिवाजी प्रागतिक), पाचवा-आध्या खापरे (वेंगुर्ला नं.1), इ.5वी ते 7वी वैयक्तिक गट-भक्तिगीत गायन-प्रथम-रूद्र स्वार (वेंगुर्ला नं.3), द्वितीय-सान्वी परब (परबवाडा शाळा), तृतीय-निशिगंधा खानोलकर (एम.आर.देसाई स्कूल), चतुर्थ-तनिष्का केळुसकर (वेंगुर्ला नं.1), पाचवा-यज्ञेश म्हाडदळकर (उभादांडा नं.1), इ.1ली ते 4थी-सामुहिक गट-समुहनृत्य-प्रथम-परबवाडा शाळा, द्वितीय-शिवाजी प्रागतिक शाळा कॅम्प, तृतीय-राणी लक्ष्मीबाई कन्याशाळा, चतुर्थ-वेंगुर्ला नं.2, इ.5वी ते 7वी-सामुहिक गट-समुहनृत्य-प्रथम-परबवाडा शाळा, द्वितीय-वेंगुर्ला नं.2 यांनी क्रमांक पटकाविला.
स्पर्धांचे परिक्षण कैवल्य पवार, माया परब, महेश बोवलेकर, विठ्ठल करंगुटकर यांनी केले. तर स्पर्धेसाठी गजानन मेस्त्री आणि अक्षय सरवणकर यांनी साथसंगत केली. यावेळी संस्थेचे कार्यकारी मंडळ सदस्य दीपराज बिजितकर, श्रीनिवास सौदागर, मयुरेश सौदागर, सचिन होडावडेकर, निशिगंधा पवार यांच्यासह शिक्षक, पालक, विद्यार्थी मोठ¬ा संख्येने उपस्थित होते. स्पर्धेत वेंगुर्ला शाळा नं.2 आणि परबवाडा शाळेने चारही गटात सहभाग घेऊन उत्तमरित्या सादरीकरण केल्याबद्दल दोन्ही शाळांना 1 हजार रूपयांचे विशेष पारितोषिक देऊन संस्थेकडून सन्मानित करण्यात येणार आहे. सर्व विजेत्यांना जानेवारी 2027 मध्ये गौरविण्यात येईल.
फोटोओळी – परबवाडा शाळेतील विद्याथ्र्यांनी उत्कृष्ट सामुहिक नृत्य सादर केले.

You cannot copy content of this page