Headlines

“दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर वैभववाडीत जलतारा, शोषखड्डे कामांना प्रारंभ…

तालुक्यात जलतारांची १७००, तर शोषखड्ड्यांची ३५०० कामे करण्याचे उद्दिष्ट..

⚡वैभववाडी ता.०३-: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विकसित भारत रोजगार आणि आजिविका हमी मिशन ग्रामीण अंतर्गत जलसंधारण कामे जास्तीत जास्त करणे आवश्यक असल्याने जलतारा व शोषखड्डे कामे मोठ्या प्रमाणात करण्याचे उद्दिष्ट प्राप्त झालेले आहे.
आज सडूरे शिराळे ग्रामपंचायती अंतर्गत सडूरे येथे जलतारा आणि शोषखड्डे यांचा शुभारंभ पंचायत समिती वैभववाडीचे सभापती सिद्धेश रावराणे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य रिद्धी सुतार, गट विकास अधिकारी,प्रमेश वाघ सहाय्यक गटविकास अधिकारी, स्नेहा माने सडूरे सरपंच, चव्हाण उपसरपंच, नवलराज काळे तंटामुक्ती अध्यक्ष, काटे रितेश सुतार, अधिकारी विस्तार अधिकारी (पंचायत) प्रकाश आडुळकर तालुका कृषी अधिकारी निरंजन देशमुख त्याचप्रमाणे सडूरे गावातील महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
यावेळी महिला शेतकरी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

जलतारा कामासाठी किमान 40 गुंठे जमीन असलेल्या जमीन धारकांना जलतारा अनुदान रक्कम रुपये 5500/- व शोषखड्डा कामासाठी अनुदान रक्कम रुपये 2500/- VB-G RAM G योजनेतून दिले जाणार आहेत.
वैभववाडी तालुक्याकरिता जलतारा चे 1700 कामांचे उद्दिष्ट आहे व शोषखड्डे कामांचे 3500 चे उद्दिष्ट आहे.
तरी वैभववाडी तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा. असे वैभववाडी पंचायत समितीचे सभापती श्री. सिद्धेश दिलीप रावराणे यांनी नागरिकांना आवाहन केलेले आहे.

You cannot copy content of this page