शालेय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी धडपडणाऱ्या सरस्वती म्हणजे सौ प्राजक्ता आपटे
*⚡वेंगुर्ला ता.१५-:* शिक्षक हे फक्त पाठ्यपुस्तकातील ज्ञान मुलांना देत नसतो, तर मुलांमधील असलेल्या सुप्त गुणांना विविध सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा, परीक्षा यातून वाव देत जणू त्यांचं जीवनकौशल्य घडविण्यात सहाय्यभूत होत असतो. अशाच शालेय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी धडपडणाऱ्या सरस्वती म्हणजे वेंगुर्ला येथील प्राथमिक शिक्षिका सौ. प्राजक्ता प्रशांत आपटे होय. झोळंबेसारख्या अतिदुर्गम भागात जन्म झालेल्या सौ आपटे (पूर्वाश्रमीच्या…
