मालवण येथे शिक्षणमहर्षी डॉ. काकासाहेब वराडकर यांची पुण्यतिथी साजरी

*⚡मालवण ता.१४-:* शिक्षणमहर्षी डॉ. काकासाहेब वराडकर यांची ४५ वी पुण्यतिथी येथील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय (सं), वराडकर इंग्लिश मीडियम स्कूल व डॉ. दादासाहेब वराडकर कला व वाणिज्य महाविद्यालय, कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय संसदेतर्फे साजरी आली. यावेळी कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अजयराज वराडकर, सचिव सुनील नाईक, शालेय व्यवस्थापन समितीचे चेअरमन सुधीर वराडकर, संचालिका स्वाती वराडकर, वराडकर हायस्कूलचे मुख्याध्यापक एन. के. कांबळे, वराडकर इंग्लिश मीडियमच्या प्र. मुख्याध्यापिका व्ही. व्ही. शिरोडकर तसेच डॉ. दादासाहेब वराडकर कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राध्यापक डी. ए. राणे, शालेय संसदेच्या पंतप्रधान निकिता मेस्त्री, उपपंतप्रधान आत्माराम म्हाडगूत, शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्याध्यापक एन. के. कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन आर. जी. कदम यांनी केले. आभार श्रीमती काळसेकर यांनी मानले.

You cannot copy content of this page