जी प अध्यक्षा संजना सावंत यांचे प्रतिपादन;बांदा शाळा नं १ येथे हात धुवा दिन साजरा
*⚡ओरोस ता १४-:* स्वच्छ भारत मिशन माध्यमातून स्वच्छतेसाठी अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. कोरोनासारखी महामारी रोखण्यासाठी हातांची स्वच्छता महत्त्वाची भूमिका बजावत आहे. आपले आरोग्य आपल्या हाती आहे तसेच प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी लहानपाणापसुनच स्वत:ची स्वत: घ्यावी व त्याची सुरुवात आपल्या स्वत:पासुन नंतर घर व गावापर्यत करावी असे प्रतिपादन जि.प. अध्यक्षा सौ. संजना सावंत यांनी केले. ग्रामपंचायत बांदा येथील शाळा बांदा नं. 1, तालुका सावंतवाडी येथे जिल्हास्तरिय हातधुवा दिनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जि.प. अध्यक्षा सौ. संजना सावंत, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर, उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर,जि.प सदस्या सौ. श्वेता कोरगावकर, सभापती.प.स. सावंतवाडी निकिता सावंत, उपसभापती.प.स. सावंतवाडी श्री. राऊळ तसेच उप.मु.का.अ (पाणी व स्वच्छता) विनायक ठाकूर, गटविकास अधिकारी पंचायत समिती सावंतवाडी श्री. कणसे व सहा. गटविकास अधिकारी श्री नाईक, सरपंच, ग्रा.प. बांदा श्री. अक्रम खान उपस्थित होते. जिल्हयात कोरोना महामारीच्या काळात सुध्दा जिल्हावासीयांनी स्वच्छतेची कास धरुन तसेच कोरोना संदर्भातील सर्व नियम पाळुन चांगला आदर्श निर्माण केलेला होता तसेच भविष्यात देखील स्वच्छतेचे विविध उपक्रम घेवुन जिल्हा आरोग्य संप्पन बनवुया असे सदर वेळी जि.प. अध्यक्षा सौ. संजना सावंत यांनी सांगीतले.जिल्हयातील नागरीक हे स्वच्छतेच्या बाबतीत खुप जागृक आहेत व यामुळे आपण साथीचे रोग किंवा कारोना सारख्या महामारीवर लवकर मात करु शकलो असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रजीत नायर यांनी केले. आपल्या हातावर असणाऱ्या असंख्य रोगजंतू आपल्या आरोग्यासाठी बाधक ठरू शकतात. या रोगजंतूना साबणाने हात धुवुन दूर केले तर सर्वांचाच भविष्यकाळ आरोग्यसंपन्न राहील. या अनुषंगाने जागतिक हात धुवा दिन निमित्ताने विविध उपक्रम राबवून जनजागृती करण्यात यावी. साबणाने हात धुण्याच्या सवयीमुळे श्वसन रोगाचा मृत्यु दर 25 टक्के कमी होऊ शकतो आणि अतिसार रोगामुळे होणारे मृत्यू सुद्धा 50 टक्के कमी होऊ शकतात. हात धुण्याच्या सवयी समाजात रुजविण्या करिता व्यापक जनजागृती कार्यक्रम राबवावे असे उप.मु.का.अ (पाणी व स्वच्छता) श्री. विनायक ठाकूर यांनी आपल्या प्रस्ताविकामध्ये सांगीतले. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. पाटिल यांनी केले. सदर दिवशी जिल्हयातील सर्व शाळा, ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपक्रेंद याठीकाणी हात धुवा दिन तसेच स्वच्छतेच्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आलेले होते.
