निरवडे प्राथमिक आरोग्य केंद्राला रूपेश राऊळ यांनी स्वखर्चाने प्रदान केले तीन बेड

*⚡सावंतवाडी,ता.१४-:* शिवसेनाप्रमुख रुपेश राऊळ यांनी स्वखर्चाने येथील निरवडे प्राथमिक आरोग्य केंद्राला आज तीन बेड प्रदान केले. वैद्यकीय अधिकारी विक्रम मस्के यांनी त्यांचे आभार मानले. त्यामुळे बेडअभावी रुग्णांची होणारी गैरसोय टळणार आहे. निरवडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला बेड उपलब्ध करून देऊ,असा शब्द राऊळ यांनी दिला होता.दरम्यान त्यांनी आज तीन बेड स्वखर्चातून उपलब्ध करून दिले आहेत. यावेळी निरवडे उपसरपंच चंद्रकांत गावडे, तळवडे सरपंच वनिता मेस्त्री,विनोद काजरेकर,सुभाष मयेकर,नीलेश शिरोडकर,अनिल जाधव,गौरव मेस्त्री,सचिन गावडे,निकिता जाधव आदी उपस्थित होते. दरम्यान रुग्णवाहिकेचे उद्घाटन करताना डॉ मस्के यांनी श्री राऊळ यांच्याकडे बेड नसल्याची खंत व्यक्त केली होती.त्यावेळी मी तुम्हाला बेड उपलब्ध करून देऊ देईन, असे आश्वासन श्री राऊळ यांनी दिले होते.त्यानुसार त्यांनी आज या केंद्राला तीन बेड उपलब्ध करून दिले आहेत. त्याचा फायदा रुग्णांना होणार आहे.

You cannot copy content of this page