*⚡कणकवली ता.१४-:* कणकवली शहरातील टेम्बवाडी येथील रहिवासी छाया शाहू सावंत ( 70 वर्ष ) यांचे गुरुवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले . गेले आठवडाभर त्यांच्यावर खाजगी दवाखान्यात उपचार सुरु होते . स्वस्थ वाटू लागल्याने त्यांना डिस्चार्जही देण्यात येणार होता . मात्र सकाळीच त्यांची प्रकृती अनपेक्षितरीत्या खालावली आणि त्यांचे निधन झाले . शहरातील प्रथितयश व्हिडीओग्राफर तसेच केबल व्यावसायिक संतोष सावंत आणि जिल्हा बँक कर्मचारी राजू सावंत यांच्या त्या मातोश्री होत .
कणकवली टेम्बवाडी येथील छाया सावंत यांचे निधन
