मातोंड येथे मसाला प्रक्रिया उद्योगाचा शुभारंभ
*⚡वेंगुर्ला ता.२८-:* गणेशदिप मसाला लघु उत्पादन महिला समूह, मातोंड- वरचेबांबर यांच्यामार्फत सर्व प्रकारचे मसाले प्रक्रिया उद्योगाला प्रारंभ करण्यात आला असून या उद्योगाचे उद्घाटन मातोंड सरपंच तथा या समूहाच्या सदस्य जानवी परब यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. या महिलांनी स्वतःच्या पर्यायाने समूहाच्या आर्थिक उन्नतीसाठी हा व्यवसाय सुरू करून महिला सक्षमीकरणाच्या दिशेने पुढचे पाऊल टाकले आहे….
