संविधानातील अधिकार जीवन जगण्याचा हक्क देतात-प्रा.वामन गावडे

*⚡वेंगुर्ला ता.२७-:* संविधानाने भारतीय नागरिकांना जे मूलभूत अधिकार व कर्तव्य दिलेले आहेत ते त्यांना सन्मानपूर्वक जीवन जगण्याचा हक्क देतात असे प्रतिपादन प्रा.वामन गावडे यांनी केले. एन.सी.सी., एन.एस.एस., आजीवन अध्ययन आणि विस्तार कार्य विभाग आणि राज्यशात्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने २६ नोव्हेंबर रोजी बॅ. खर्डेकर महाविद्यालय वेंगुर्ला येथे भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला. तत्पूर्वी २६/११ व २००८ रोजीच्या मुंबई येथील दहशतवादी हल्यामधील शहीदाना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर संविधानाच्या उद्देशपत्रिकेचे वाचन राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. आनंद बांदेकर यांनी केले. यावेळी सदर प्रा.एस.टी. भेंडवडे, प्रा.आर.जी.चौगुले, प्रा.एस.एच.माने, प्रा.डी.आर. अरोलकर, प्रा.डॉ.एम.एम.मुजुमदार, प्रा.एन.एस.नवात्रे, प्रा.एस.जी.चुकेवाड, प्रा.एल.बी.नैताम आणि एन.एस.एस.स्वयंसेवक व एन.सी.सी कॅडेट्स उपस्थित होते. एन.एन्.सी.सी प्रमुख लेफ्टनंट डॉ.बी.जी गायकवाड यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले.

You cannot copy content of this page