सुजित जाधव:कुडाळ मध्ये चर्मकार समाज विद्यार्थी गुणगौरव..
⚡कुडाळ ता.०३-: आपल्या समाजासाठी उपवर्गीकरण हा सेन्सिटिव्ह विषय आहे याबाबत आवाज उठवण्यासाठी सर्वांनी जागे झाले पाहिजे. ही उपवर्गीकरण विरोधी चळवळ गावागावात नेऊ, वेळप्रसंगी न्याय्य हक्कासाठी रस्तावर उतरू, असा इशारा सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ जिल्हा अध्यक्ष सुजित जाधव यांनी कुडाळ येथे समाजाच्या कार्यक्रमात दिला.
सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ, तालुका शाखा कुडाळच्या वतीने भव्य विद्यार्थी गुणगौरव व सत्कार सोहळा येथील मराठा समाज हॉल येथे तालुकाध्यक्ष संतोष चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. सोहळ्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी कार्यालय नायब तहसीलदार प्रदीप पवार यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.
यावेळी कुडाळ तालुका अध्यक्ष संतोष चव्हाण, माजी जिल्हाध्यक्ष विजय चव्हाण, आत्माराम ओटवणेकर, जिल्हा सरचिटणीस चंद्रसिंग पाताडे, सावंतवाडी उपनगराध्यक्ष अँड अनिल निरवडेकर, गटविकास अधिकारी सावंतवाडी निलेश जाधव, कुडाळ पोलीस स्टेशनचे प्रमोद काळसेकर, नंदन वेंगुर्लेकर, नरेंद्रकुमार चव्हाण, मनोहर सरमळकर, गुरुनाथ तेंडुलकर, श्रीराम चव्हाण, रामदास चव्हाण, प्रिया आजगावकर, के टी चव्हाण, राजन वालावलकर, सुरेश पवार, उदय शिरोडकर, मधुकर जाधव, मधुकर चव्हाण, नितीन बांबर्डेकर, प्रमोद आजगावकर, मनीषा पाताडे, राजेंद्र चव्हाण, उत्तम चव्हाण, महेंद्र चव्हाण, विनायक चव्हाण, हरेश चव्हाण, अनंत नेवरेकर, गणपत चव्हाण, जिल्ह्यातील समाजाचे पदाधिकारी समाज बांधव विद्यार्थी वर्ग आदी उपस्थित होते.
श्री जाधव म्हणाले, संत रोहिदास, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रत्येकाने अभ्यास केला पाहिजे, त्यांच्यामुळेच आपले अस्तित्व आहे. समाजात वावरताना समाजाच्या मूलभूत प्रश्नांसाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे. आरक्षण बाबतचा जो विषय आहे त्याबाबत न्याय्य हक्कासाठी लढा देऊ. वेळप्रसंगी रस्त्यावर उतरू असा इशारा दिला.
विजय चव्हाण यांनी समाजाच्या सर्वागीण विकासासाठी सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ कार्यरत आहे. जिल्ह्यात कुडाळ तालुक्याचे काम कौतुकास्पद आहे. समाजाचा विकासात्मक रथ उन्नती मंडळ पुढे नेत असताना आपण प्रत्येकाने समाजासाठी एक दिवस तरी दिला पाहिजे, असे सांगत आज या कार्यक्रमाला विद्यमान जिल्हाध्यक्षसह सहा अध्यक्ष व्यासपीठावर आहेत हीच खरी समाजाच्या प्रगतीची ताकद असल्याचे सांगितले.
तालुकाध्यक्ष संतोष चव्हाण यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुलांसाठी ज्या शिष्यवृत्ती योजना आहे. त्याचा लाभ घ्यावा यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असे सांगितले.
चंद्रसेन पाताडे यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांमुळे आम्हाला शिक्षणाची गती बरोबरच आरक्षण मिळाले. आता उपवर्गीकरणाचा जो प्रश्न आहे त्यासाठी आमचे आंदोलन असल्याचे सांगितले. नायब तहसीलदार प्रदीप पवार यांनी स्पर्धात्मक युगात वाटचाल करताना भविष्याची ध्येयधोरणे स्वीकारून वाटचाल करा जिद्द चिकाटी मेहनत या त्रिसूत्राचा अवलंब करून पुढे चला असे आवाहन केले. निलेश जाधव, श्री ओटवणेकर यांनीसुद्धा मार्गदर्शन केले.
यावेळी नायब तहसीलदार प्रदीप पवार यांचा सन्मानपत्र देऊन विशेष सत्कार करण्यात आला. तसेच विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये सूचित जाधव, विजय चव्हाण, आत्माराम ओटवणेकर, अँड अनिल निरवडेकर, प्रकाश चव्हाण, चंद्रसेन पाताडे, नंदन वेंगुर्लेकर, अँड राजीव कुडाळकर आदींचा समावेश होता.
२०२५-२६ मधील इयत्ता चौथी, पाचवी, सातवी व आठवी स्कॉलरशिप परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी; जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा पास होऊन प्रवेश घेतलेले विद्यार्थी; शासनमान्य स्पर्धा स्पर्धा उत्तीर्ण विद्यार्थी; तसेच दहावी, बारावी, पदविका, पदवी आणि पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण विद्यार्थी आदींचा मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
सुरुवातीला क्रांतीज्योती महिला मंडळ यांनी स्वागतगीत सादर केले. रोशन चव्हाण यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर गीत सादर केले. प्रास्ताविक सचिव नरेंद्रकुमार चव्हाण यांनी केले. कार्यक्रम सूत्रसंचालन प्राध्यापक नितीन बांबर्डेकर यांनी केले, तर आभार मनिषा पाताडे, मधुकर चव्हाण यांनी यांनी मानले.
