आपल्या पाठपुरवाव्यामुळेच प्रभाग ७ मधील विकासकामांचा आलेख चढता राहिला – पूजा करलकर

*⚡मालवण ता.२७-:* मालवण नगरपालिकेत सत्ता कोणाचीही असो, आणि नगराध्यक्ष कोणत्याही पक्षाचा असो, आपल्या सततच्या पाठपुराव्या मुळेच गेली १५ वर्षे शहरातील प्रभाग ७ मधील विकास कामांचा आलेख चढताच राहिलेला आहे. अलीकडेच प्रभाग सात मध्ये विविध रस्त्यांची रुंदी करणे व डांबरीकरणे, पार्किंग व्यवस्था, पाणी साठवणूक बंधारे आदी विविध कामे ही आपण केलेल्या सततच्या पाठवपुराव्याचीच पुरावे आहेत अशी प्रतिक्रिया मालवणच्या नगरसेविका सौ. पूजा करलकर यांनी दिली आहे. मालवण बसस्थानक ते दलित वस्ती रस्ता रुंदीकरण व पेव्हर ब्लॉक बसविणे (रु. १५,८१,३५९), हॉटेल महाराजा ते दलित वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण (२३,६७,९९६), भरड येथील पार्किंग व्यवस्था (३४ लाख) तसेच काम पूर्ण झालेला देऊळवाडा स्मशान ते दलित वस्तीकडे जाणारा रस्ता (६२ लाख), रामेश्वर मंदिर मागील रस्ता काँक्रीटीकरण व मजबुतीकरण करणे (३ लाख), रामेश्वर मंदिर ते पुलापर्यंत रस्त्याचे काँक्रीटीकरण (३,२५,०००), देऊळवाडा सातेरी मंदिर व रामेश्वर मंदिर खालील वहाळावरील पाणी साठविण्याचे कायमस्वरूपी बंधारे (२७ लाख), सध्या टेंडर प्रोसिजर झालेले करलकर घरनजीकच्या गणेश कोंडीचे सुशोभीकरण करणे (१३ लाख) व रानडे घरानजीकच्या पानंदीचे काँक्रीटीकरण करणे (१,७८,०००) टेंडर प्रोसिजर होणे बाकी. आदी विविध कामे २०१६ ते २०२१ या कालावधीत प्रभाग सात मध्ये झालेली आहेत. आपल्या सततच्या पाठवपुराव्यामुळे कामे पूर्ण झाली तर काही प्रस्तावित आहेत याबाबत नागरिकांकडून समाधान व्यक्त होत असून यासाठी प्रशासनाचे आभारी आहोत, असेही नगरसेविका पूजा करलकर यांनी म्हटले आहे.

You cannot copy content of this page