*⚡वेंगुर्ला ता.२८-:* भांडवली बाजारात गुंतवणूकीविषयी जागरुकता मोठ्या प्रमाणात वाढली असून नवतरुण पिढीला यामध्ये खूप संधी असल्याचे प्रमुख व्याख्याते प्रा.विमलकुमार अशर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. येथील बॅ.खर्डेकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व इन्व्हेस्टर एज्युकेशन अॅण्ड वेल्फेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने भांडवल बाजाराविषयक जागरुकता यावर परिसंवाद संपन्न झाला. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.व्ही.पी.नंदगिरीकर, सदस्य प्रा.एल.बी.नैताम, प्रा.बी.जी.गायकवाड, प्रा.एम.एम.मुजुमदार, प्रा.वामन गावडे, प्रा.देविदास आरोलकर, प्रा.जे.वाय.नाईक यांच्यासह शिक्षकेत्तर कर्मचारी व राष्ट्रीय योजनेचे स्वयंसेवक उपस्थित होते. स्वयंसेवकांनी ज्ञानसाधनेबरोबर आपले व्यक्तिमत्व विकसित करण्यासाठी चांगल्या विचारांचे संस्कार आत्मसात करणे गरजेचे आहे. चांगल्या विचारातून विधायक कार्य घडते असे मत प्राचार्य डॉ.विलास देऊलकर यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा.सदाशिव चुकेवाड यांनी सूत्रसंचालन तर प्रा.विवेक चव्हाण यांनी आभार मानले.
भांडवल बाजाराविषयक जागरुकता परिसंवाद संपन्न
