*⚡वेंगुर्ला ता.२८-:* गार्डन्स क्लब कोल्हापूर, इंडियन वुमन सायंटिस्टअसोसिएशन, बॅ खर्डेकर महाविद्यालय, वेंगुर्ला व रोटरॅक्टक्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘फ्लोरल स्कूल‘ ह्या ऑनलाईन कोर्सचे आयोजन करण्यात आले होते. ह्याचे दुसरे पर्व २६ व २७ नोव्हेंबर रोजी पार पडले. यामध्ये पहिल्या दिवशी डॉ.सुनिती देशमुख यांनी पाश्चिमात्य शैलीच्या पुष्परचनांवर सादरीकरण केले. तसेच ‘इकेबाना‘ ह्या प्रकारातील एल -आकाराच्या, हॉरिझाँटल, क्रीसेंन्ट, होगार्थ अशा नानाविध सुंदर पुष्परचना करुन दाखविल्या. तर दुस-या दिवशी इकेबाना प्रकारातील मोरीबाना, शोहिन डी, हानामाई, वन रो ह्या अत्यंत सुंदर अशा पुष्परचना प्रात्यक्षिकाद्वारे शिकविल्या. डॉ.सौ.धनश्री पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तर दिपाली तायवाडे-पाटील यांनी आभार मानले. नितीन कवठणकर व करिष्मा मोहिते यांनी ह्या तांत्रिक बाजू सांभाळल्या.
फ्लोरल स्कूल‘चा ऑनलाईन कोर्स संपन्न
