सावंतवाडीत २९ जानेवारीला रंगणार विभागीय कवयित्री संमेलन
*⚡सावंतवाडी ता.३१-: येथील आरती मासिक, कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखा व श्रीराम वाचन मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी येथे प्रतिवर्षी आयोजित केले जाणारे निमंत्रितांचे १६ वे विभागीय कवयित्री संमेलन शनिवार २९ जानेवारी रोजी होणार आहे. आतापर्यंत झालेल्या कवयित्री संमेलनातून महाराष्ट्र, गोवा, बेळगाव येथील विविध भागांतून सुमारे शंभरपेक्षा अधिक कवयित्रींनी सहभाग घेऊन रसिकांची दाद मिळविली…
