देवगड तालुका महिला भाजपची पोलिस निरीक्षकांकडे मागणी..
देवगड ता.३०-: सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे सहकार समृद्धी पॅनलचे प्रमुख सतीश सावंत यांनी जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत,प्रज्ञा ढवण, तसेच अन्य महिला पदाधिकारी याना शिवीगाळ केली व अर्वाच्य भाषेत हडतुड करून धमकी दिली असल्याने त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी देवगड तालुका भाजप महिला मोर्चा,व भाजप तालुका देवगड यांच्या वतीने देवगड पोलीस निरीक्षकांकडे केली आहे.
देवगड पोलीस उपनिरीक्षक शेखर सावंत यांचेकडे निवेदन सादर करण्यात आले.या वेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष बाळ खडपे,प्रकाश राणे महिला मोर्चा तालुका अध्यक्ष संजना आळवे,माजी नगराध्यक्षा प्रियांका साळसकर,प्रणाली माने,तन्वी चांदोस्कर,गौतमी कदम,भाजप तालुका अध्यक्ष संतोष किंजवडेकर,जिल्हा कार्यकारणी सदस्य संदीप साटम माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर,उपनगराध्यक्ष उमेश कणेरकर,संजय तारकर, योगेश पाटकर अनिल कोरगावकर,डॉ अमोल तेली,उत्तम बिर्जे,अन्य भाजप पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
