*⚡देवगड ता.३०-:* सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पंचवार्षिक निवडणुकीसाठी देवगड केंद्रावर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला एकूण ८३ मतदारांपैकी ८१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावीला. देवगड तहसीलदार कार्यालयात तहसीलदार मारुती कांबळे यांच्या उपस्थितीत मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे.
या केंद्रात एकुण ८३ जण मतदानाचा हक्क बजाविणार होते त्या पैकी ८१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावीला आहे. मतदाना पासून मतदारांमध्ये विविध का.सेवा सोसा.१मतदार औद्योगिक मजूर सहकारी संस्था गट १ मतदाराने मतदानाचा हक्क बजावीला नाही.मतदान बजावलेल्या मतदारांमध्ये,विविध कार्यकारी सेवा सोसा.३७ पैकी३६,नागरी पतपुरवठा ८ पैकी ८ शेती प्रक्रिया ग्राहक संस्था ११पैकी ११,औद्योगिक मजूर सहकारी संस्था ११पैकी १०,मच्छिमार ,दुग्ध संस्था ५ पैकी ५,घरबांधणी,विणकर संस्था २,बिगर सह संस्था व्यक्ती सभासद,९पैकी ९ मतदारांनी हक्क बजाविला.
