Headlines

बांद्यात डंपर व कार यांच्यात समोरासमोर अपघात

सुदैवाने कोणीही जखमी नाही : वाहतूक सुरळीत सुरू *⚡बांदा ता.१४-:* मुंबई गोवा महामार्गाचे काम सुरु असल्याने सध्या वनवे वाहतूक सुरु आहे. दरम्यान, बांदा स्मशानभूमी नजीक हॉटेल कावेरी समोर डंपर व कार यांच्यात आज सकाळी समोरासमोर अपघात झाला. यात कारच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातात सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. डंपर चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा…

Read More

वेंगुर्ले पत्रकार समितीचे जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

युवापिढी समोरील आव्हाने आणि संधी यावर दहावी ते महाविद्यालयीन गटाला सहभागाचे आवाहन *⚡वेंगुर्ला ता.१४-: वेंगुर्ला तालुका पत्रकार समिती तर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून ‘युवापिढी समोरील आव्हाने आणि संधी‘ या विषयावर जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा दहावी ते महाविद्यालयीन गटामध्ये होणार असून यासाठी सुमारे ५०० ते ७०० शब्दमर्यादा ठेवण्यात आलेली आहे. कोरोना…

Read More

शैक्षणिक दाखले मिळवून देण्याचे संदिप मेस्त्री यांनी गाठले शतक

सलग ११ वर्षे विनामूल्य सेवा; राजकारणातून साधले समाजकारण *⚡कणकवली ता.१४-: राजकारण हे केवळ माध्यम असून राजकारणातून समाजसेवा करता येते याचे मूर्तिमंत उदाहरण कलमठ येथील संदीप मेस्त्री यांनी दाखवून दिले आहे. राजकारणात विविध पदे भूषवित असताना समाजकारण हाच राजकारणाचा पाया असल्याचे या निमित्ताने संदीप मेस्त्री यांनी दाखवून दिले आहे. सलग ११ वर्षे संदीप मेस्त्री निःस्वार्थीपणे विद्यार्थ्यांना…

Read More

फोंडाघाट सोसायटीमध्ये शासनातर्फे भात खरेदीचा शुभारंभ

कणकवली 13 जानेवारी (प्रतिनिधी)- फोंडाघाट विकास सेवा सोसायटी येथे चालू वर्षी शेतकऱ्यांकडून खरेदी केल्या जाणाऱ्या भाताच्या खरेदीचा शुभारंभ, चेअरमन राजन चिके यांनी वजन काट्याला पुष्पहार अर्पण करून, तर ज्येष्ठ नेते बबनमामा हळदिवे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.यावेळी हेमंत रावराणे, राजन नानचे, प्रसाद देसाई, विलास गुरव, विश्‍वनाथ जाधव, बंडु जाधव, नंदू जाधव सोनू कोकरे,गणेश इ….

Read More

ओसरगाव संस्थेच्या अध्यक्षपदी सदानंद मोरे

तर उपाध्यक्षपदी प्रभाकर सावंत बिनविरोध *⚡कणकवली ता.१३-:* कणकवली तालुक्यातील ओसरगाव येथील श्री. लिंगमाऊली विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेची पदाधिकारी निवड प्रक्रिया संस्थेच्या ओसरगाव येथील कार्यालयात पार पडली. यामध्ये अध्यक्षपदी सदानंद सीताराम मोरे तर उपाध्यक्षपदी प्रभाकर धाकू सावंत यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे.ही निवड प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी कृ. रा.धुळप यांच्या उपस्थितीत पार पडली….

Read More

अन्यथा मराठीत नसलेल्या नामफलकांवर काळे फासण्यात येईल

दुकान मालकांना मनसे दणका देईल;दया मेस्त्री यांचा इशारा *⚡कणकवली ता.१३-: ज्या दुकाने, आस्थापनांची नावे, पाट्या इतर भाषेत असल्यास मराठी भाषेत नसल्यास इतर भाषेत असणाऱ्या सर्व नामफलकांवर काळे फासण्यात येईल. असा इशारा मनसे उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री यांनी दिला आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे नावे मराठीत करण्यासाठी एक महिना कालावधी म्हणजेच 13 फेब्रुवारी 2022 पर्यंतची मुदत दिली जात असून…

Read More

जिल्हा परिषदेत पोहोचले नारायण राणे

अचानक दाखल झाल्याने पदाधिकारी-अधिकाऱ्यांची उडाली धांदल सिंधुदुर्गनगरी ता १३ जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात दाखल झालेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज जिल्हा परिषदेला अचानक भेट देत खातेप्रमुख आणि पदाधिकारी यांच्या कडून कामकाजाचा आढावा घेतला. जिल्हा बँकेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीच्या निमित्ताने जिल्ह्यात दाखल झालेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज जिल्हा परिषदेला सकाळी ११ वाजता…

Read More

अचिर्णे – खांबाळे ते अरुळे रत्याचे काम सुरू करा

अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन धनगर समाज महासंघाच्या नवळराज काळे यांचा इशारा वैभववाडी प्रतिनिधी पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून घेण्यात आलेल्या अचिर्णे – खांबाळे ते अरुळे रत्याचे काम प्रत्यक्षात सुरू करून धनगर समाज वस्तीतील जनतेला होणाऱ्या नाहक त्रासापासून मुक्त करावे अन्यथा जनतेच्या वतीने लोकशाही मार्गाचा अवलंब करू असा इशारा ऑल इंडिया धनगर समाज महासंघ कोकण प्रदेशाध्यक्ष नवलराज काळे…

Read More

कलम बांधणी व रोपवाटीका व्यवस्थापन प्रशिक्षण संपन्न

वेंगुर्ला प्रतिनिधी – वेंगुर्ला प्रादेशिक फळ संशोधन केंद्रात १२ जानेवारी रोजी दुर्लक्षित वनस्पती कलम बांधणी व रोपवाटीका व्यवस्थापन विषयक प्रशिक्षण घेण्यात आले. यात २४ नर्सरीधारकांनी लाभ घेतला.       डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठ दापोली आणि लुपिन  फाऊंडेशन सिधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथे सुरंगी, त्रिफळ, वटसोल, वावडिग, कडीकोकम आणि…

Read More

नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सोमवारी फैसला

*⚡सिंधुदुर्ग ता.१३-:सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी संतोष परब हल्ला प्रकरणात भाजप आमदार नितेश राणे आणि संदेश सावंत यांनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावरील मुंबई हायकोर्टातील सुनावणी पूर्ण झाली आहे. आता न्यायमू्ती चंद्रकांत भडंग हे या प्रकरणात सोमवारी निकाल देणार आहेत. दरम्यान, निकाल येईपर्यंत नितेश राणे आणि संदेश सावंत यांना अटकेपासून मिळालेला दिलासा कायम असणार आहे.

Read More
You cannot copy content of this page