बांद्यात डंपर व कार यांच्यात समोरासमोर अपघात

सुदैवाने कोणीही जखमी नाही : वाहतूक सुरळीत सुरू

*⚡बांदा ता.१४-:* मुंबई गोवा महामार्गाचे काम सुरु असल्याने सध्या वनवे वाहतूक सुरु आहे. दरम्यान, बांदा स्मशानभूमी नजीक हॉटेल कावेरी समोर डंपर व कार यांच्यात आज सकाळी समोरासमोर अपघात झाला.

यात कारच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातात सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. डंपर चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. स्थानिकांच्या सहकार्याने दोन्ही वाहने बाजूला करुन महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली.

You cannot copy content of this page