दुकान मालकांना मनसे दणका देईल;दया मेस्त्री यांचा इशारा
*⚡कणकवली ता.१३-: ज्या दुकाने, आस्थापनांची नावे, पाट्या इतर भाषेत असल्यास मराठी भाषेत नसल्यास इतर भाषेत असणाऱ्या सर्व नामफलकांवर काळे फासण्यात येईल. असा इशारा मनसे उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री यांनी दिला आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे नावे मराठीत करण्यासाठी एक महिना कालावधी म्हणजेच 13 फेब्रुवारी 2022 पर्यंतची मुदत दिली जात असून अन्यथा सदर मालकांना मनसे दणका देईल असा इशारा दिला आहे. मनसे उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री यांनी विभागीय दंडाधिकारी, डिवायएसपी कणकवली, तहसीलदार कणकवली यांना आपल्या कार्यक्षेत्रातील दुकाने, आस्थापनांची नावे पाट्या मराठी भाषेत करण्यासाठी एक महिन्याची मुदत देत असल्याचे निवेदन दिले आहे.यावेळी दत्ताराम अमृते, निलेश मेस्त्री, सुशील परब आदी मनसे पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र राज्य शासनाने मराठी भाषेत दुकाने व इतर अस्थापना यांच्या नावाच्या पाट्या करण्याचा नवा कायदा काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आला याबाबत महाराष्ट्र सरकारचे अभिनंदन. अखेर सरकारला मनसेच्या मागणीचा विचार करावाच लागला. यापूर्वीदेखील नावाच्या पाट्या या मराठीतच करण्याचा कायदा करण्यात आला होता. मात्र मराठी भाषेला अग्रक्रम नव्हता कुठेतरी कोपऱ्यात दिसेल न दिसेल अशा अक्षरात मराठी लिहिले जात होते. मात्र आज या नवीन कायद्यानुसार मराठी अक्षरे मोठ्या सुवाच्च अक्षरात अग्रस्थानी लिहिण्यात येणार आहेत. माय मराठी भाषा व लिखाण हे मराठीत असावे या महाराष्ट्रात या मराठीला प्राधान्य देण्यात यावे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मराठी अस्मिता जोपासत असताना राज ठाकरे यांनी आदेश देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अनेकदा महाराष्ट्रभर या मराठीच्या अस्मितेसाठी आंदोलने केली. मराठी पाट्या नसलेल्या दुकानांचे पाट्या मराठीत करण्यासाठी कायदा हातात घेतला.
मनसेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या लढ्याला मनसेच्या मराठी अस्मितेला यश प्राप्त झाले आहे. सरकारने मराठीत दुकान आस्थापने आदींची नावे ठळक व प्राधान्यक्रमाने मराठीतच करण्याचा कायदा केला आहे. ही माहिती आपल्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या सर्व दुकाने व आस्थापना कळविण्यात यावे. लवकरात लवकर मराठीत नसलेल्या पाट्या मराठीत करून घ्याव्यात आपणाकडून तशा सक्त सूचना देण्यात याव्यात मराठी अस्मिता जोपासणारा हा कायदा आपणाकडून तात्काळ अमलात आणला जावा.ज्या दुकाने आस्थापनांची नावे पाट्या इतर भाषेत असल्यास मराठी भाषेत नसल्यास इतर भाषेत असणाऱ्या सर्व नाम फलकांवर काळे फासण्यात येईल. सदर मालकांना मनसे दणका दिला जाईल.यामुळे उद्भवणार्या परिस्थितीस आपण जबाबदार असाल असा इशारा मनसे उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री यांनी दिला आहे.
