तर उपाध्यक्षपदी प्रभाकर सावंत बिनविरोध
*⚡कणकवली ता.१३-:* कणकवली तालुक्यातील ओसरगाव येथील श्री. लिंगमाऊली विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेची पदाधिकारी निवड प्रक्रिया संस्थेच्या ओसरगाव येथील कार्यालयात पार पडली. यामध्ये अध्यक्षपदी सदानंद सीताराम मोरे तर उपाध्यक्षपदी प्रभाकर धाकू सावंत यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे.ही निवड प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी कृ. रा.धुळप यांच्या उपस्थितीत पार पडली. याप्रसंगी शिवसेना कणकवली तालुकाप्रमुख शैलेश भोगले, कळसुली विभागप्रमुख तथा वागदे उपसरपंच रुपेश आमडोसकर यांनी नूतन अध्यक्ष, उपाध्यक्ष व नवनिर्वाचित संचालक मंडळाचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
यावेळी मावळते अध्यक्ष प्रदीप तळेकर, नवनिर्वाचित सर्व संचालक-मुरलीधर परब, सत्यवान देसाई, विजय परब,विजय सावंत,भगवान आलव, नंदकुमार गावडे, बापू कांबळी, हेमंत कुमार तांबे, मनीषा आलव, नुपूर मोरे,सुलोचना खरात यासंह नाना परब, निलेश मोरे, घनश्याम राणे, मंगेश आलव, नयन आलव, सुनील राणे, बापू आलव आदी उपस्थित होते.
