सलग ११ वर्षे विनामूल्य सेवा; राजकारणातून साधले समाजकारण
*⚡कणकवली ता.१४-: राजकारण हे केवळ माध्यम असून राजकारणातून समाजसेवा करता येते याचे मूर्तिमंत उदाहरण कलमठ येथील संदीप मेस्त्री यांनी दाखवून दिले आहे. राजकारणात विविध पदे भूषवित असताना समाजकारण हाच राजकारणाचा पाया असल्याचे या निमित्ताने संदीप मेस्त्री यांनी दाखवून दिले आहे.
सलग ११ वर्षे संदीप मेस्त्री निःस्वार्थीपणे विद्यार्थ्यांना हे दाखले मिळवून देण्याचे काम अखंडपणे करत आहेत. १० वी, १२ वी निकालानंतर शैक्षणिक दाखल्यांसाठी पालक आणि विद्यार्थ्यांची धावपळ उडते, मागील सलग ११ वर्षे संदीप मेस्त्री निःस्वार्थीपणे विद्यार्थ्यांना हे दाखले मिळवून देण्याचे काम अखंडपणे करत आहेत. कोरोनाच्या महामारीतही यावर्षी आपल्या या सामाजिक उपक्रमात संदीप मेस्त्री यांनी खंड पडू दिला नाही हे विशेष होय. यावर्षीही १० वी, १२ वी च्या निकालानंतर ४-५ महिन्यात १०० हुन अधिक दाखले मिळवून देत विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेणे करून सुलभ करून दिले. जातीचा दाखला, उत्पन्न दाखला, नॉन क्रिमिलेयर, वय अधिवास आदी दाखले मिळण्यासाठी पालक आणि तहसील, प्रांत ऑफिसदरम्यान विनामोबदला सेतू बनून संदिप मेस्त्री यांनी दाखले कोरोना काळात लॉकडाऊन असतानाही गरजू विद्यार्थ्यांना स्वतः मेहनत घेत मिळवून दिले दाखले आहेत. कणकवली तालुक्यातील विद्यार्थ्यांना विविध दाखले मिळवून देण्यासाठी विशेष मेहनत घेतली आहे, यावर्षी संदीप मेस्त्री यांनी १०० शैक्षणिक दाखल्यांचा आकड़ा पार केला आहे.खेडेगावातून येणाऱ्या विद्यार्थी आणि पालक याना शासकीय दाखले मिळवताना त्रास होता नये याची काळजी संदीप मेस्त्री यांनी घेतली, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दाखल्यांसाठी लागणारी कागदपत्र गोळा करण्यापासून दाखला पूर्ण होईपर्यंत संदीप मेस्त्री यांनी काम केले आहे. काही वेळा पालक सुद्धा पॉझिटिव्ह असताना तहसीलदार व प्रांत यांच्याशी संवाद साधत विद्यार्थ्यांना दाखले बिनादिक्कत मिळवून दिले.
यासाठी कणकवली प्रांताधिकारी वैशाली राजमाने, कणकवली तहसीलदार रमेश पवार, सेतू कार्यालय यांचे मेस्त्री याना लाभले मोलाचे सहकार्य , कोरोनाच्या महामारीतही विनासायास दाखले मिळाल्यानंतर पालक आणि विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील समाधानाने आणखी काम करण्याची ऊर्जा मिळते अशी प्रतिक्रिया संदीप मेस्त्री यांनी व्यक्त केली. गेली ११ वर्षे सातत्यपूर्ण संदीप मेस्त्री हे आपल्या माध्यमातून शैक्षणिक दाखले घरपोच देत असून मुंबई व बाहेर जिल्ह्यात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कुरियरने दाखले पाठवन्याचे काम केले आहे. या कार्याचे सर्व स्तरातून कौतुकच होत आहे.
