अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन धनगर समाज महासंघाच्या नवळराज काळे यांचा इशारा
वैभववाडी प्रतिनिधी पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून घेण्यात आलेल्या अचिर्णे – खांबाळे ते अरुळे रत्याचे काम प्रत्यक्षात सुरू करून धनगर समाज वस्तीतील जनतेला होणाऱ्या नाहक त्रासापासून मुक्त करावे अन्यथा जनतेच्या वतीने लोकशाही मार्गाचा अवलंब करू असा इशारा ऑल इंडिया धनगर समाज महासंघ कोकण प्रदेशाध्यक्ष नवलराज काळे यांनी दिला आहे.
याबाबतचे निवेदन त्यांनी पंतप्रधान ग्रामसडक योजना मुख्य कार्यालय सिंधुदुर्ग येथे दिले आहे.या निवेदनात असे म्हटले आहे की, पंतप्रधान ग्रामसडक योजनेतुन घेण्यात आलेल्या अचिर्ण-दार्या (खांबाळे) ते अरुळे रस्त्याचे काम प्रत्याक्षात सुरु करणे अत्यंत गरजेचे आहे. धनगर समाज वस्तीत दळणवळणाची सोय नसल्यामुळे विद्यार्थी, वृद्ध, गरोदर माता व इतर जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामूळे या समाज बंधुंना लवकरात लवकर दळणवळणाची सोय करुन मिळावी. त्यासाठी शासन दरबारी प्रलंबीत असलेले अचिर्णे – दार्या (खांबाळे) ते अरुळे रस्त्याचे काम त्वरित पुर्णत्वास जाण्यासाठी आपल्या कार्यालयाकडुन योग्य ती कार्यवाही करून जनतेला न्याय द्यावा. प्रत्यक्षात काम सुरु न झाल्यास जनतेच्या वतीने लोकशाही मार्गाचा अवलंब करु असा इशारा ऑल इंडिया धनगर समाज महासंघ कोकण प्रदेशाध्यक्ष नवलराज काळे यांनी दिला आहे.
यावेळी ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे सिंधुदुर्ग जिल्हा सचिव ॲड. विक्रमसिंह काळे, अरुळे ग्रामपंचायत माजी सदस्य सुर्यकांत अनंत बोडके, आचिर्णे ग्रामपंचायत माजी सदस्य नवलु पांडुरंग झोरे, धुळाजी आप्पाजी काळे (आचिर्णे), नाऊ धाकलू बोडेकर (खांबाळे दार्या) जनार्दन धोंडू बोडके (आचिर्णे), जनार्दन बाबू बोडके (अरुळे), मधुकर विठोबा कोकरे (कुर्ली), भागीरथी नाऊ बोडेकर(खांबाळे दार्या) आदी धनगर बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
