कणकवली नगरवाचनालयाच्या हस्ताक्षर स्पर्धेत ओंकार ठाकूर व राशी राणे प्रथम
*⚡कणकवली ता.२७-:* कणकवली नगरवाचनालय आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरावडा निमित्त ५ वी.ते८ वी.वयोगटातील हस्ताक्षर स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला.यामध्ये ओंकार ठाकूर व राशी राणे यांनी विभागून प्रथम क्रमांक पटकावला.व्दितीय निशांत राणे, तृतीय विभागून हर्षाली राणे,विधी चिंदरकर तर उत्तेजनार्थ विभागून सबुरी नानचे,आदित्य खानोलकर यांनी मिळविला.विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते त्यांना रोख रक्कम व सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले….
