कणकवली नगरवाचनालयाच्या हस्ताक्षर स्पर्धेत ओंकार ठाकूर व राशी राणे प्रथम

*⚡कणकवली ता.२७-:* कणकवली नगरवाचनालय आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरावडा निमित्त ५ वी.ते८ वी.वयोगटातील हस्ताक्षर स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला.यामध्ये ओंकार ठाकूर व राशी राणे यांनी विभागून प्रथम क्रमांक पटकावला.व्दितीय निशांत राणे, तृतीय विभागून हर्षाली राणे,विधी चिंदरकर तर उत्तेजनार्थ विभागून सबुरी नानचे,आदित्य खानोलकर यांनी मिळविला.विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते त्यांना रोख रक्कम व सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले.

राज्याची राज्यभाषा असलेल्या मराठी भाषेचा वापर जास्तीत जास्त व्हावा.तसेच मराठी भाषेचे संवर्धन व्हावे या हेतूने दरवर्षी मराठी भाषा संवर्धन पंधरावडा १४जाने. ते २८ फेब्रुवारी या कालावधीत साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.त्याचे औचित्य साधून प्रजासत्ताक दिनादिनी नगरवाचनालय कणकवली येथे हस्ताक्षर स्पर्धेचा पारितोषिक वितरण कार्यक्रम पार पडला. यावेळी ह्यूमन राईट असो.च्या पदाधिकाऱ्यांनी ग्रंथालयाला ग्रंथ भेट म्हणून दिली.

यावेळी वाचनालयाचे कार्यवाह हनिफ पीरखान,कार्यकारणी सदस्य महेश काणेकर,नगरसेविका मेघा गांगण,प्रतीक्षा सावंत,मेघा सावंत, पी.जे.कांबळे,रविंद्रनाथ मुसळे, वैजयंती करंदीकर,दादा कोरडे,पालक व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मेघा गांगण यांनी मानले.

You cannot copy content of this page