असलदे सरपंच पंढरी वायंगणकर यांच्या पाठपुराव्याला आले यश
*⚡कणकवली ता.२७-:* देश,राज्य ,जिल्हा घडविण्यासाठी शिक्षण महत्वाचे आहे.त्यासाठी अंगणवाडी हा शिक्षणाचा पाया असतो.त्या अंगणवाडीचे भूमिपूजन करण्याचे भाग्य लाभले आहे.आपला गावचा सरपंच कसा असावा, त्याचे उदाहरण म्हणजे पंढरी वायगणकर आहे.
असलदे या गावात सरपंच पंढरी वायगणकर ,नूतन चेअरमन,पत्रकार भगवान लोके यांच्यासारखी रत्ने आहेत,असे प्रतिपादन सभापती मनोज रावराणे यांनी केले. असलदे तावडेवाडी मिनी अंगणवाडी भूमिपूजन सोहळा कणकवली सभापती मनोज रावराणे यांच्या शुभहस्ते पार पडले.यावेळी कणकवली भाजपा मंडल अध्यक्ष मिलिंद मेस्त्री,प.स. सदस्या. सौ.हर्षदा वाळके,कणकवली तालुका सरचिटणीस व असलदे सरपंच शपंढरी वायंगणकर, उपसरपंच संतोष परब, शक्तीकेंद्र प्रमुख भाई मोरजकर,ग्रामसेवक आर.डी.सावंत, सोसायटी चेअरमन व पत्रकार भगवान लोके, व्हॉईस चेअरमन दयानंद हडकर,प्रकाश परब,दिनकर दळवी,ग्रा.प. सदस्या.संचीता नरे,प्रतिभा खरात,वंदना हडकर, नीलिमा तांबे, शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शामसुंदर लोके,उपाध्यक्ष राजेश राणे, तंटामुक्ती अध्यक्ष. बाबाजी शिंदे, परशुराम परब,मनोहर खोत,सतीश पोकळे,दशरथ कोकरे,वैभव वायंगणकर, शाळा मुख्याध्यापक श्री.जंगले गुरुजी,सह शिक्षक नार्वेकर, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते. पंचायत समिती सदस्य हर्षदा वाळके म्हणाल्या,नूतन मिनी अंगणवाडी भूमिपूजन करण्यात आले.
या शाळेचे सूंदर नियोजन केले आहे.ही संस्था शाळा चांगल्या प्रकारे काम करत आहेत,मंदिराबरोबर शाळाही चांगली असावी,त्याचे उद्दात उदाहरण म्हणजे ही शाळा आहे.आदर्श शाळेचे हे मॉडेल तयार झाले आहे. ही अंगणवाडी मंजूरी आ.नितेश राणे, जि.प.अध्यक्षा सौ.संजना सावंत, सभापती शमनोज रावराणे यांच्या विशेष प्रयत्नातून झाली. या कार्यक्रमात सभापती मनोज रावराणे, शाल व श्रीफळ देऊन सत्कार संस्थचे अध्यक्ष श शामसुंदर लोके यांनी केले. मिलिंद मेस्त्री यांचा सत्कार संस्थेचे खजिनदार दिनकर दळवी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सभापती मनोज रावराणे यांना वाढदिवस लहान मुलांच्या उपस्थितीत केक कापून साजरा करण्यात आला.
