*⚡मालवण ता.२७-: कोरोना महामारी काळात मालवण तालुक्यात कोरोना सेंटरमध्ये रुग्णांना सेवा देणारे कंत्राटी कर्मचारी व सामाजिक कार्यकर्त्या व्यक्तींना मालवण तहसीलदार कार्यालयाकडून कोरोना योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले. तहसीलदार अजय पाटणे यांच्याहस्ते त्या कोरोना योद्धा सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. कोरोना काळात मालवणातील कोरोना सेंटरमध्ये आरोग्य विभागाचे कंत्राटी कर्मचारी व इतर सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींनी रुग्णांना आवश्यक असलेली आरोग्य सेवा, जेवणाची सोय व इतर प्रकारची मदत केली. या सेवेबद्दल त्यांना तहसीलदार कार्यालयाकडून कोरोना योद्धा सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
प्रजासत्ताक दिनी टोपीवाला हायस्कूल येथे पार पडलेल्या शासकीय ध्वजवंदन कार्यक्रमात तहसीलदार अजय पाटणे यांच्याहस्ते या व्यक्तींना गौरविण्यात आले. यामध्ये गुरुनाथ अंकुश तोडणकर, संजय रमेश केरकर, सुनील वसंत कदम, सखू भास्कर सोळंकी, किशोर सत्यवान जाधव, आनंदी आनंद जाधव, क्रांती कमलाकर धुरी, दिनेश तोंडवळकर, प्रदीप धाकू शिंदे, अश्विनी आशिष कवटकर, संजना साईनाथ सारंग यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर मालवणचे पोलीस निरीक्षक एस. एस. ओटवणेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, नायब तहसीलदार गंगाराम कोकरे, टोपीवाला हायस्कूलचे मुख्याध्यापक मिलिंद अवसरे, भंडारी हायस्कूलचे मुख्याध्यापक व्ही. जी. खोत आदी व इतर उपस्थित होते.
