तर दोडामार्ग मध्ये सर्वसाधारण पुरुष आरक्षणाने भाजप समोर पेच…
*⚡सिंधुदुर्ग ता.२७-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाची सोडत आज मुंबई येथे पार पडली आहे. यामध्ये कुडाळ, देवगड आणि वैभववाडी मध्ये महिलांना संधी मिळाली असून, या ठिकाणी सर्वसाधारण महिलांना आरक्षण जाहीर झाले आहे. तर दोडामार्ग मध्ये सर्वसाधारण पुरुष आरक्षण पडल्याने भाजपच्या संतोष नानचे, चेतन चव्हाण आणि राजेंद्र प्रसादी या तीन उमेदवारांपैकी कोणाच्या गळ्यात नगराध्यक्ष पदाची माळ पडते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
